बेकरी व्यवसायास भविष्यात फार मोठी संधी,बेकआर्ट हा लोकप्रिय ब्रँड ठरेल -अभिजीत पाटील

बेकरी व्यवसायास भविष्यात फार मोठी संधी,बेकआर्ट हा लोकप्रिय ब्रँड ठरेल -अभिजीत पाटील

बेकआर्ट बेकरीचे अभिजीत पाटील यांच्या हस्ते उदघाटन

पंढरपूर शहरानजीक असलेल्या तीनरस्ता येथे बेकआर्ट बेकरीचे धाराशिव साखर कारखान्याचे  चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे संदीप खारे, आबासाहेब खारे, जयंत सलगर, नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, देगावचे मा. उपसरपंच सुरेशतात्या घाडगे, काकासाहेब पाटील, महादेव दंदाडे, डाॅ. खटावकर, मारूती भाऊ आटकळे, सज्जननाना पाटील, अविभाऊ चव्हाण, प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर जावळे,पोलीस पाटील दत्ता चव्हाण, आण्णा वायदंडे, विश्वास पाटील, रमेश जावळे, पोपट घाडगे, सर्जेराव घाडगे, परवेज मुजावर, गणेश घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी बोलताना चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले कि बेकरी हा उद्योग भारतात खुप मोठ्या प्रमाणात संधी असलेला उद्योग आहे. बेकरी उत्पादनाची मागणी दिवसागणिक वाढली जातेय. बेकरी म्हणलं की केक, बिस्किटे, पाव,बटर, पेस्टीज कुकीज् असे असंख्य पदार्थ चविला मिळतात. वाढत्या तरूणाईला आनंद लुटणाऱ्यासाठी केक कापण्याची चांगलीच पद्धत रूजू झालीय त्यामुळे भविष्यात या उदोगाला मोठी संधी आहे.या बेकरी व्यवसायासाठी हणमंत पाटील, श्रेयश खटावकर, सज्जन घाडगे यांनी एकत्रित येत कोरोनाची महामारी असताना सुद्धा भविष्याचा वेध घेऊन पुढचे पाऊल टाकले हि कौतुकास्पद बाब आहे.
यावेळी उपस्थितांनी या नव्या व्यवसायास भरभरून शुभेच्छा दिल्या तर हणमंत पाटील, श्रेयश खटावकर, सज्जन घाडगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago