सांगोला बँकेचे शाखा व्यवस्थापक शिवाजी दरेकर यांच्यासह ८ जणांचा कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्काराने होणार गौरव
मराठा सेवा संघाच्या वतीने ३० व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्काराची घोषणा
मराठा सेवा संघाचा तिसावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला असून या निमित्त विविध क्षेत्रात कर्तव्यनिष्ठता जपणाऱ्यास कर्तव्यनिष्ठ पुरस्काराची घोषणा झाली असून आपल्या कर्तव्याशी सदैव प्रामाणिक राहणाऱ्या बँक अधिकारी शिवाजी दरेकर यांचाही समावेश आहे.
मराठा सेवा संघाचा ३० वा वर्धापन दिन नुकताच अंत्यंत उत्साहाच्या वातावरणात परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळी सुरक्षितता बाळगून साजरा झाला राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस पुष्पहार करून या वर्धापन दिनाचा प्रारंभ करण्यात आला. वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रमाता जिजाऊ मुलींचे वसतिगृह येथे वृक्षारोपण करण्यात आले.
या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मराठा सेवा संघाचे कर्तव्यनिष्ठ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागात काम करीत असलेल्या तसेच निमशासकीय सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थेतील उत्कृष्ट सेवा बजावणारे अधिकारी, कर्मचारी याना हा सन्मानाचा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
सांगोला को, ऑप. बँक लि. शाखा पंढरपूर येथे कार्यरत असलेले बँक व्यवस्थापक ऍड. शिवाजी दरेकर याना हा मनाचा पुरस्कार घोषित करून दरेकर यांच्या कर्तव्य परायण सेवेची दखल घेण्यात आली आहे. दरेकर हे बँक क्षेत्रातील तज्ञ म्हणून ओळखले जातातच परंतु आपल्या सेवेशी ते सदैव प्रामाणिक असतात, त्यामुळे बँकिंग क्षेत्रात त्यांचा लौकिक आहे. त्यांच्यासारखा अधिकारी मिळणे हे भाग्य असल्याचे बँक वर्तुळात बोलले जाते. त्यांना हा कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार घोषित झाल्याने सर्वत्र समाधानच व्यक्त होत आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले,पंढरपूर डाक विभागातील सहाय्यक अधीक्षक राजकुमार बळीराम घायाळ, विद्या विकास प्रशाला टाकळीचे मुख्याध्यापक बिभीषण सिद्राम साळुंखे, पुळूजचे तलाठी खंडू हिंदुराव गायकवाड, पटवर्धन कुरोलीचे ग्रामसेवक चंद्रशेखर सोपं गिड्डे, पंढरपूर पंचायत समितीतील स्वच्छ भारत मिशनचे क. सहाय्यक शांतीनाथ मनोहर आदमाने, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बालाजी शिवाजी कदम, परिवहन महामंडळाचे लिपिक अमर विठ्ठल जाधव यांनाही हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…