आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत हमाल मापाडी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत हमाल मापाडी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा उपक्रम
कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार व अखिल भारतीय साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पंढरीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कार्यरत हमाल व मापाडी यांना हमाल मापाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या हस्ते मोफत सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात.यावेळी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे,सीताराम रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 या बाबत अधिक माहिती देताना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष गणेश गोडसे म्हणाले कि,आमचे मार्गदर्शक आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोज नित्य अनेक लोकांशी संपर्क येत असलेल्या कृषीउत्पन्न बाजार समितीमधील कष्टकरी हमाल व मापाडी बांधवांच्या आरोग्य रक्षणार्थ सॅनिटायझर आणि मास्कची गरज ओळखून वाटप करण्यात आले.
     यावेळी हमाल मापाडी संघटनेचे पदाधिकारी मारुती बनपट्टे,देवा गांडूळे,मधू वाघ,आबाजी शिंदे,संतोष सावंत,हरिभाऊ कोळी,राजाभाऊ जाधव,श्रीमंत डांगे,अंकुश कदम,रघुनाथ कांबळे,भीमा धनवे,नवनाथ सुरवसे,बाळासाहेब घोडके,उत्तरेश्वर गोफणे,समाधान आवताडे यांच्यासह शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी बालाजी खंदारे,सोमनाथ ढवण,विकास घोलप,नागनाथ शिरतोडे,महेश बोचरे,अविनाश पवार,अमोल रणदिवे आदी उपस्थित होते.
चौकट-
आ.रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
प्रचंड जनसंपर्क,सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची जाण,तरुणाईशी थेट संवाद या माध्यमातून कार्यरत असलेले आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर अनेक सामाजिक व विधायक उपक्रम राबविले जातात.आज आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आम्ही आज राबिवला आहे.व त्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातही असेच विधायक उपक्रम राबविण्याचा मानस आहे
   – गणेश गोडसे
(जिल्हाध्यक्ष :शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान )
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

7 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago