नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

           पंढरपूर.दि.24:   अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे  तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करावेत अशा सूचना, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

           सोलापूर जिल्ह्यातील  पंढरपूर तालुक्यातील गार्डी, कासेगांव, सांगोला तालुक्यातील महूद येथील कासाळ-गंगा ओढा तसेच माळशिरस तालुक्यातील मळोली येथील अतिवृष्टिने पूर आल्यामुळे  नुकसानग्रस्त पिकांची व पडझड झालेल्या घरांची पहाणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केली.

            यावेळी, आमदार भारत भालके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, उदयसिंह भोसले, शमा पवार, तहसिलदार वैशाली वाघमारे, योगेश खरमाटे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, संतोष राऊत, स्मिता पाटील, तालुका कृषि अधिकारी गजानन ननवरे ,दिपाली जाधव, राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता  दत्तात्रय गावडे, महावितरणचे श्री.कासार  आदी उपस्थित होते.

            यावेळी पालकमंत्री म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टिने  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड  झाली आहे. पंढरपूर, माळशिरस व सांगोला तालुक्यातील 54 गावांतील मोठ्या प्रामाणात पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे 6500 ते 7000 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त 517 कुटुबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच बंधाऱ्यांचे व पाझर तलावांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पुराच्या पाण्यामुळे काही गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाला असल्याने विद्युत पुरवठा पुर्वरत करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

        अतिवृष्टिने शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थित शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शासनस्तरावरुन आवश्यकती मदत करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले. 

          यावेळी आमदार भारत भालके यांनी नुकसानगस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना शासनाच्या वतीने तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.

 पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टिमुळे  विविध ठिकाणी नुकसान झालेल्या  भागांची  माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी  यावेळी पालकमंत्री भरणे यांना दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

22 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago