राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश संघटकपदी कु. चारुशिला कुलकर्णी यांची निवड

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश संघटकपदी कु. चारुशिला कुलकर्णी यांची निवड

पंढरपूर (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश संघटकपदी कु. चारुशिला कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निमंत्रक खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा कु. सक्षणा सलगर यांनी नुकतेच या निवडीचे पत्र कु. चारुशिला कुलकर्णी यांना दिले.

आपल्या निवडीबद्दल बोलताना कु. चारुशिला कुलकर्णी म्हणाल्या की,  ‘‘पक्ष बळकटीसाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे आणि देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रयमामा भरणे, पंढरपूर मंगळवेढ्याचे लोकप्रिय आमदार भारतनाना भालके, राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सतत प्रयत्नशील राहु. वरिष्ठांनी माझ्यावर विश्‍वास टाकुन जी जबाबदारी सोपविली आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडु.’’ असे मत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या नुतन प्रदेश संघटक कु. चारुशिला कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

कु. चारुशिला कुलकर्णी या गेल्या कित्येक वर्षापासुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी युवतीच्या शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी लक्षवेधी कार्य केले आहे. गौरी-गणपती सजावट स्पर्धा, देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान, वृक्षारोपन, रक्तदान शिबीर अशा प्रकारचे विधायक उपक्रम राबविले आहेत.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस बांधवांना मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप,  बेघर, निराश्रीतांच्या निवार्‍याची व्यवस्था. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लॉकडाऊन काळात भाजीपाला, अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप असे उल्लेखनीय कार्य त्यांनी केलेले आहे. समाजाच्या हितासाठी विविध आंदोलनातही त्यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.   

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

18 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago