वर्ष-वर्ष खड्डे बुजवत नाहीत तरीही अशोका ब्रिजवेजची टोल वसुली कशासाठी – श्रीकांत शिंदे
टाकळी-कासेगाव-अनवली रस्त्यावरील पथकर वसुली बंद पाडण्याचा इशारा
पंढरपूर शहरातून होणारी जड वाहतूक बंद करण्याच्या हेतूने व कर्नाटकात जाणारी अनेक वाहने वेणेगाव-पंढरपूर-मंगळवेढा मार्गे जात असल्यामुळे पर्यायी बायपास रस्ता म्हणून टाकळी-कासेगाव-अनवली हा रस्ता अशोका ब्रिजवेज या खाजगी कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात आला.गेल्या दहा-बारा वर्षांपासून सदर अशोका कंपनीच्या माध्यमातून टोळ वसुली केली जात असली तरी या रस्त्याची अवस्था मात्र अतिशय वाईट असल्याचे दिसून येत असून जागोजागी रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे अनेक छोट्या मोठ्या अपघातांना आमंत्रण देणारे ठरत आहेत.या गंभीर प्रकाराची दखल घेत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले असून जर आठ सदर रस्ता दुरुस्त नाही केला तर या टोळनाक्यावरून पथकर टोळ वसुली करू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे.
२०१३ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेत असताना राज्यातील अनेक पथकर नाके बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यावेळी तुंगत येथील पथकर नाकाही बंद झाला होता.मात्र टाकळी-अनवली या टोळनाक्याची मुदत संपत आल्याने तो आपोआप बंद होईल अशी अपेक्षा होती.मात्र पुढे सदर अशोका ब्रिजवेजला या मार्गावर पथकर वसुली सुरु ठेवण्यास पुन्हा परवानगी देण्यात आली.या अशोका ब्रिजवेज कडून सदर रस्त्याची निगा राखण्याकडे कायम दुर्लक्ष करण्यात येते अशीच प्रतिक्रिया सतत व्यक्त होत आली आहे.आता हा टोळ नाका कायमचा बंद होणार कि रस्त्यांवर तात्पुरती मलमपट्टी करून पुढे अनेक वर्षे टोळ वसुली करत राहणार असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…