प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनला पुन्हा मुदतवाढ आता दि. ३० सप्टेंबर पर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन

प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनला पुन्हा मुदतवाढ

आता दि. ३० सप्टेंबर पर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन

पंढरपूर: कोरोना महामारीमुळे प्रशासकीय यंत्रणेकडून प्रमाणपत्रे मिळण्यास झालेला विलंब पाहता अनेक जण अजून प्रवेश प्रक्रियेपासून वंचित आहेत. याचा विचार करून प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग साठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी शासनाने मुदत वाढ दिली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळमुंबई म्हणजेच एम.एस.बी.टी.ई. मार्फत चालवल्या जाणाऱ्या दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशन साठी मुदत वाढ मिळाली असून विद्यार्थ्यांना आता दिनांक ३० सप्टेंबर २०२० अखेर पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज डीटीईच्या वेबसाईटवरून भरता येणार आहेत. या अगोदर रजिस्ट्रेशन करण्याची मुदत २५ ऑगस्ट पर्यंतच दिली होती. त्यात वाढ करून २१ सप्टेंबर दिली होती त्यात आणखी वाढ केली असून विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबर पर्यंत मुदत दिल्याने इंजिनीअरिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी संधी मिळणार आहे.’ अशी माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (पॉलिटेक्निक) पंढरपूरचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.

     यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावरती दि. ०३ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.जर प्रवेश अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर दुरुस्ती दिनांक ०४ ते ०६ ऑक्टोबर या दरम्यान करता येईल. यानंतर ०८ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना अंतिम गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावर पाहता येईल. प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पडताळणी करून रजिस्ट्रेशन करता येणार आहे. मागील वर्षी राज्यातील केवळ चार डिप्लोमा कॉलेजमध्येच १०० टक्के ऍडमिशन झाले होते. खाजगी महाविद्यालयांमध्ये १०० टक्के ऍडमिशन होणारे स्वेरीचे डिप्लोमा कॉलेज हे राज्यातील एकमेव कॉलेज ठरले. यंदाही स्वेरी कॉलेजला पालकांनी व विद्यार्थ्यांनी पहिली पसंती दिली आहे. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली सुविधा केंद्राचे कामकाज सुरु आहे. या अनुषंगाने सुविधा केंद्रावर पालकांची व विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी पहावयास मिळते आहे. या मुदतवाढीचा लाभ दहावी उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी तसेच अजून ज्यांना डिप्लोमा अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे परंतु अद्याप ज्यांनी रजिस्ट्रेशन केले नाही त्यांना घेता येणार आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणीछाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. डिप्लोमा प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा. एस. एस. गायकवाड- मोबा.क्र.९८९०५६६२८१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago