मोहोळ-पंढरपूर-आळंदी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर
प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या कार्यपद्धतीमुळे आली महामार्गाच्या कामाला गती
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आळंदी-पंढरपूर या पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाची गरज ओळखून या रस्त्याच्या कामास व आवश्यक भूसंपादन प्रक्रियेस तातडीने चालना दिली.मात्र त्यांनी भविष्यातील गरज ओळखून हा महामार्ग थेट मोहोळ पर्यंत जोडण्याचाही निर्णय घेतला होता.या महामार्गाच्या कामासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध झाल्यामुळे तसेच पंढरपूर व मोहोळचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी भूसंपादन प्रक्रिया पार पडताना सर्व बाधित जमीन मालकांशी अगदी वैयक्तिक पातळीवर संपर्क करून,त्यांच्या शंका व हरकतीच्या निराकरण करून व संपादित जमिनीची शासकीय नियमाप्रमाणे दिली जाणारी आर्थिक भरपाई तातडीने त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात अतिशय समर्पक भूमिका बजावल्यामुळे सद्य गतीने सुरु असलेल्या या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात असताना प्रांताधिकारी सचिन ढोले यांचेही कौतूक केले जात असल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री गडकरी यांनी २०१४ मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर या खात्याची जबाबदारी सांभाळली होती.त्यांनी धडाडीने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात अनेक ठिकाणी रस्ते कॉक्रिटकरण व चौपदरीकरण निर्णायक धडाका लावला आहे.तात्काळ आवश्यक तो निधी उपलब्ध होत असल्यामुळे सोलापूर-पंढरपूर-आळंदी या मार्गाचे कामही गतीने सुरु झाले.या रस्त्याच्या भूसंपादनात हजारो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी,राहती,घरे,रस्त्यालगतचे विविध व्यसायीक ठिकाणी हि बाधित होणार असल्यामुळे भूसंपादन प्रकिया अतिशय किचकट बनली होती.तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडत होता. मात्र अतिशय संयतपणे व प्रत्येकाचा विश्वास संपादन करीत प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी भूसंपादन प्रक्रिया पार पाडली आणि हे काम अतिशय दर्जेदार व्हावे यासाठी ते स्वतः जातीने लक्ष घालत असल्याचे दिसून येत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…