पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्याना अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई त्वरीत मिळावी – आमदार प्रशांत परीचारक

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्याना अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई त्वरीत मिळावी – आमदार प्रशांत परीचारक  

पंढरपूर १९ :- पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात मागील काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेत व पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्या बाधीत शेतकऱ्यांंचे शेतजमीन, घरे, जनावरे यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई लवकरात लवकर बाबत राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब,
उपमुख्यमंत्री श्री.अजीतदादा पवारसाहेब, तसेच कृषी मंत्री श्री.दादासाहेब भुसे, मदत व पुर्नवसन मंत्री
श्री.विजय वडेट्टीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री,  सोलापूर जील्ह्याचे पालकमंत्री श्री.भरणे साहेब व जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे आ.प्रशांत परीचारक यांनी लेखी पत्राद्बारे मागणी केली असल्याचे सांगीतले.
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात गेली दोन ते तीन दिवस जवळ-जवळ १२८ मी.मी. पाऊस झाला
आहे, असे समजते. शासनाच्या न{यमानुसार ज्या भागामध्ये ६५ मी.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यास अतिवृृृष्टी  होते. यामुळे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील नदी, नाले,
ओढे तुडुंब भरून वाहत आहे., डाळींब, ऊस आदी पीक वाहून गेलेली आहेत. ओढे,
नाले, नदीच्या आसपासच्या जमिनी वाहुन गेल्यामुळे शेतीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
पंढरपूर तालुक्यातील कासेगांव, खर्डी, भाळवणी, चळे, पुळुज, भंडीशेगांव या सर्कलमध्ये खुप
शेतकऱ्यांचे नुकसान झाले तसेेेच घरावरील पत्रे उडुन गेलेली आहेत. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरांच्या भिंती पडल्या आहेत व  जनावरही वीज कोसळल्यामुळे मरण पावली आहेत. तसेच गेली तीन दिवस अष्टीमुळे
नदीवरील, ओढ्यावरील पुल पाण्यामुळे वाहुन गेल्याने काही गावांचा संपर्कही तुटला आहे.
तसेच मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे  खरीप पिकांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे कोवीड-१९ या जागतीक महामारीच्या रोगामुळे शेतकèयांच्या पिकांना
कवडीमोलाचा भाव मीळत आहे. यामध्ये देखील निसर्गाने घात केल्याने शेतकèयांचे जीवन विस्कळीत
झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थीक संकटात सापडला आहे. महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय सीएलएस-
२०१९/प्र.क्र.१७७/म-३ दि.११/९/२०२० नुसार अतिवृष्टी व पूरामुळे शेतपीकांचे नुकसान झाल्याने
बाधीत शेतकरी असलेल्या मदती दराच्या तिप्पट दराने येणारी रक्कम मदत म्हणून देण्यास  मान्यता देणेत आली आहे. या पार्श्वभूमीवर त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी याबाबत
आ.प्रशांत परिचारक यांनी संबंधीतांशी संपर्क साधला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago