तपासणीस येणाऱ्या पथकाला खरी माहिती द्यावी : पालकमंत्री  माझे कुटुंब माझी जबाबदारी म़ोहिमेस सहकार्याचे आवाहन

तपासणीस येणाऱ्या पथकाला खरी माहिती द्यावी : पालकमंत्री

 माझे कुटुंब माझी जबाबदारी म़ोहिमेस सहकार्याचे आवाहन  

पंढरपूर, दि.19:-  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही शासनाची मोहीम संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहीमेतंर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीसाठी घरी येणाऱ्या आरोग्य पथकास संपूर्ण माहिती द्यावी नागरिकांनी आजाराची कोणतीही माहिती लपवू नये असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

         मौजे चिखली, ता.मोहोळ येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’  या मोहिमेतंर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  आमदार यशवंत माने, सरपंच इंदूबाई वाघमोडे, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भिमाशंकर जमादार, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, नायब तहसिलदार राजशेखर लिंबारे, तालुका आरोग्य अधिकारी अरुण पाथरुटकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

            यावेळी पालकमंत्री भरणे म्हणाले,  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेतंर्गत शहर, गाव, वस्ती यातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांना आरोग्य बाबतचे शिक्षण देण्यात आहे. आपण स्वत: आपले  व कुटुंबाची जबाबदारी घ्यावी जेणे करुन आपल्याला व आपल्या कुटुंबाला कोरोनाची बाधा होणार नाही.  त्यासाठी तोंडाला मास्कचा वापर, सुरक्षित अंतर,  सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनावा संसर्ग रोखण्यासाठी या माहीमेत लोकसहभाग महत्वाचा असून सर्व नागरिकांनी या मोहीमेतंर्गत आरोग्य तपासणी करुन घ्यावी व आरोग्य पथकास सहकार्य करावे असे, आवाहनही पालकमंत्री भरणे यांनी यावेळी केले.

            ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही शासनाची मोहीमेत सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा. आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तर आपण नक्कीच आपले गाव, शहर तसेच जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी हातभार लागेल असे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.

           कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेतंर्गत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती गटविकास अधिकारी  अजिंक्य येळे यांनी दिली

पालकमंत्री भरणे यांनी  मते कुटुंबियांची घेतली भेट

          ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेतंर्गत  मौजे चिखली तालुका मोहोळ येथे मते कुटंबियांच्या घरी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आरोग्य पथकासह भेट दिली. आरोग्य पथकाकडून मते कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री भरणे यांनी कोरोना पासून स्वत: ला आपल्या कुटुंबाला  सुरक्षित कसे ठेवायचे. घरात कोणती काळजी घ्यावी. याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार यशवंत माने, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर,  जिल्हा आरोग्य अधिकारी भिमाशंकर जमादार उपस्थित होते.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago