नरसिह मंदिराच्या कळसारोहण सोहळ्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पंढरपुरातयेणार-राजू खरे
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोपाळपूर ता.पंढरपूर येथील दोनशे वर्षे जुन्या असलेल्या नरसिह मंदिराच्या कळसारोहण सोहळ्यासाठी लवकरच पंढरपुरात येणार असल्याची माहिती या मंदिराचे जीर्णोद्धाराक राजू खरे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली आहे.
उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलिंद माने यांचे सख्खे मावसभाऊ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्य सचिव अनिलकुमार गायकवाड यांचे सख्खे मेहुणे व मूळचे पंढरपूरचे असलेले राजू खरे यांची गोपाळपूर तालुका पंढरपूर येथे शेतजमीन व फार्महाउस आहे.या ठिकाणी अतिशय पुरातन असे नरसिह देवतेचे मंदिर आहे.या मंदिराची मोठी महती असून राजू खरे यांनी सदर शेतजमीन खरेदी केल्यानंतर येथील या पुरातन अशा नरसिह मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प सोडला होता.या मंदिराचे प्राचीनत्व कायम ठेवत अतिशय चांगल्या पद्धतीने जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नरसिह हे कुलदैवत आहे. त्यामुळे त्यांच्या हस्ते सदर मंदिराचे कळसारोहन केले जावे यासाठी राजू खरे हे आग्रही होते. त्यांनी केलेल्या विनंतीला मान देत देवेंद्र फडणीवस यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास होकार दिला असून या बाबत तारीख व वेळ येत्या दोन तीन दिवसात जाहीर केली जाईल,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मोजक्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली आहे.अशी माहिती राजू खरे यांनी दिली आहे
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…