सोलापूर जिल्हा गौरी – गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण : राष्ट्रवादी युवतींचा सहभाग
राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस सोलापूर जिल्हा आयोजित,सोलापूर जिल्हा गौरी – गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण विजेत्या स्पर्धकांच्या घरी जाऊन करण्यात आले.
कोरोनाचे संकट आले असले तरी महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून .खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी युवती प्रदेश अध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश मिळावा या हेतूने ऑनलाईन गौरी – गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्यांना भेटवस्तू, प्रमाणपत्र आणि तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धे मध्ये सोलापूर जिल्ह्यामधून 130 जणांनी सहभाग नोंदवला होता.
माळशिरस,पंढरपूर आणि मोहोळ या तालुका मधून 3 नंबर काढून तसेच सोलापूर जिल्हा मधून 3 नंबर काढण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम न घेता विजेत्यांचा घरोघरी जाऊन बक्षिसे देण्यात आली.
युवती जिल्हाध्यक्ष कु.श्रीया किरण भोसले यांच्या पुढाकारातून हा उपक्रम घेण्यात आला होता. सदर स्पर्धेचे निकाल पुढील प्रमाणे-
सोलापूर जिल्हा –
अनघा गोसावी,पंढरपूर (प्रथम ),
वासंती जाधव मंगळवेढा ( द्वितीय),
विद्या चंदनकार,मोडनिंब (तृतीय)
पंढरपूर तालुका आणि शहर-
श्री व सौ.प्रदीप कवडे (प्रथम),
श्री व सौ.जयश्री अजित पालसांडे ( द्वितीय)
सौ.संगीता काळे (तृतीय) व
उत्तेजनार्थ कविता पाटील, माधुरी परदेशी यांनी सहभाग नोंदवून बक्षीस मिळवली होती.
यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीया भोसले,
,पंढरपूर तालुका अध्यक्ष सौ.किर्ती मोरे, पंढरपूर शहराध्यक्ष डॉ.अमृता मेनकुदळे आणि हर्षदा परचंडराव उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…