इसबावी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाची पुन्हा मोठी कारवाई
५ वाहनांसह १८ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर शहरानजीकच असलेल्या इसबावी या उपनगरालगतच्या नदीकाठच्या परिसरातून सातत्याने अवैध वाळू उपसा होत असलेले वारंवार झालेल्या कारवायांमुळे सिद्ध झाले आहे.२८ ऑगस्ट रोजी इसबावी नजीकच्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत जवळपास ३८ लाख रुपयांचा अनेक वाहनांसह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला होता.मंगळवारी रात्री उशिरा पुन्हा याच परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने अतिशय धाडसी कारवाई केली असून या कारवाईत ५ वाहनांसह १८ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रकरणातील फिर्यादी पो.कॉ.कल्याण भोईटे (नेमणूक पोलीस मुख्यालय संलग्न ग्रामीण पोलीस विशेष पथक) यांच्यासह सदर विशेष पथकातील पो.नि. व्ही.आर.बहिर,पो.कॉ ५३२ मदने,पो.कॉ.२१६५ झिरपे,पो.कॉ.५४३ हेंमाडे,पो.कॉ.१३३० जाधव हे खाजगी वाहनाने पेट्रोलींग करत असताना इसबावी येथून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु असल्याची त्यांना माहिती मिळाली.आपले वाहन दूर अंतरावर उभा करून सदर पोलीस कर्मचारी हे अवैध वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी गेले असता तेथे त्यांना अवैध वाळू उपसा केलेले मोठं मोठे वाळूचे ढीग आढळून आले.व काही इसम चारचाकी वाहनातून सदर वाळू भरून नेत असताना आढळून आले.पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना गराडा घालताच ४ अज्ञात व्यक्ती अंधाराचा फायदा घेत पळून गेले. तर सदर प्रकरणी १) गणेश सुभाष झाडबुके २) उमेश राजू धोत्रे ३)विजय महादेव देशमुख 4)शुभम प्रकाश साबळे 5)प्रकाश ज्ञानेश्वर कांबळे 6)आकाश सुनील धोत्रे यांच्यासह इतर चार इसमा विरोधात कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तर या प्रकरणी १) महिंद्रा पीक अप एम १३ आर ०९८१ अर्धा ब्रास वाळूसह अंदाजे किंमत ५ लाख ३५०० २) विना क्रमांकाचा अशोक लेलँड वाहन अर्धब्रास वाळूसह अंदाजे किंमत ६ लाख ३५०० ३) टाटा योद्धा बिगर आरटीओ क्रमांकाचे वाहन अर्धब्रास वाळूसह किंमत अंदाजे ६ लाख ३५०० तसेच दोन मोटार सायकली व खोरे पाटीसह इतर साहित्य असा एकूण अंदाजे १८ लाख ११ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
कधी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाकडून तर कधी स्थानिक पोलीस प्रशासनाकडून इसबावी येथील अवैध वाळू उपशावर वारंवार कारवाई होत असताना महसूलचे संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी नक्की करतात तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…