करकंब पोलिसांची एकाच दिवशी चार हातभट्टी दारू विक्रेत्यांवर कारवाई
अवैध दारू विक्रीबाबत माहिती देण्यासाठी नागिरकांनी पुढे यावे- स.पो.नि.प्रशांत पाटील
पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलीस ठाण्यांतर्गत असेलेल्या भोसे,उंबरे यासह करकंब येथे दोन ठिकाणी अवैधरित्या हातभट्टी दारू विक्रेत्यांवर एकाच दिवशी कारवाई केली आहे.गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत करकंब पोलीस ठाण्याअंतर्गत विविध गावातील अवैध दारू विक्रेत्यांवर सातत्यपूर्ण व सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या असून नागिरकांनी आपल्या परिसरात अवैध दारू विक्रीचा प्रकार आढळून आल्यास थेट संपर्क करावा असे आवाहन करकंब पोलीस ठाण्याचे स.पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी केले आहे.
करकंब पोलिसांनी सोमवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी भोसे ते शेवते रस्त्यावर धनाजी उर्फ बंडु वसंत तळेकर हा त्यांचे राहते घराचे पाठीमागे पांढरे रंगाचे प्लँस्टिकचे कँन्ड घेवुन हातभट्टी दारूची विक्री करताना आढळून होता.तर करकंब ते जाधववाडी रोडवर तळयासमोरील पत्र्याच्या शेडच्या पाठीमागे एक इसम बसलेला अवैध दारु विक्री होत असल्याची माहीती मिळाली असता करण्यात आलेल्या कारवाईत १५ लिटरचे कॅण्डमधून राजु अनंत धोत्रे वय – 35 वर्षे रा.करकंब हा इसम हातभट्टी विक्री करत आल्याचे दिसून आले.तसेच करकंब गावातील इसम नामे अविनाश बंडू शिंदे हा राजा पंढरीचा व्यापारी संकूल च्या पाठीमागे चिलारीचे झुडपात चोरुन दारुची विक्री करीत आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने करण्यात आलेल्या कारवाईत पांढऱ्या रंगाच्या पिशवीतून अविनाश बंडू शिंदे वय 25वर्षे रा. धाकटी वेश करकंब हा अवैध दारू करीत असल्याचे दिसून आले.तर उंबरे येथील अंबादास हरिसिंग रजपुत हा इसम प्लास्टिक कॅन्डमध्ये हातभट्टी विक्री करता घेऊन बसल्याचे आढळून आले.
वरील सर्व आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ ई नुसार करकंब पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.स.पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विविध ठिकाणच्या या कारवायांमध्ये पो.ना.शेटे, पोहेकाँ 247 हरिहर, पोना/1746 गिरमकर , पोकाँ/ 26 भोसले, पोकाँ/ 1510 रमेश फुगे, पोहेकाँ/02रानगट, पोना/1696 कोऴवले, पोना/175खांडेकर, पोना/134 पाटेकर, पोना 526जाडकर, पोना 369 गव्हाणे,पो.कॉ. /ब.नं. 26 भोसले, पोना/518 डी बी सुळ व पोना/1897 आर आर जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.