कंगना राणावतचा कोणताही चित्रपट पंढरपुरात प्रकाशित होऊ देणार नाही
युवा सेना शहर प्रमुख महावीर अभंगराव यांचा निर्धार
शिवसेना व अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद आणखीनच वाढत असल्याने याचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ही उमटत आहेत. यातच आता आगामी काळात अभिनेत्री कंगना राणावतचा कोणताही चित्रपट पंढरपुरात प्रकाशित होऊ देणार नाही असा इशारा युवा सेना पंढरपूर शहर प्रमुख महावीर अभंगराव यांनी दिलेला आहे.
अभिनेत्री कंगना राणावत हिने आपल्या चित्रपट सृष्टीकडेच पहावे. विनाकारण मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे साहेब व शिवसेना यांच्या विषयी कोणतेही बिनबुडाचे आरोप करू नयेत ते शिवसैनिक कदापीही सहन करणार नाही.
शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय ना. उध्दवजी ठाकरे साहेब हे आमचे दैवत आहेत. अशा आमच्या दैवताविषयी अभिनेत्री कंगना राणावत हिने एकेरी भाषा वापरून माझ्यासह तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखविलेल्या आहेत. यामुळे जोपर्यंत कंगना राणावत मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे साहेबांची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत कंगनाचा कोणताही चित्रपट पंढरपुरात प्रकाशित होऊ देणार नाही असा इशारा युवा सेना पंढरपूर शहर प्रमुख महावीर अभंगराव यांनी दिलेला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…