लाईफलाईन हाॅस्पिलचा चेंडू, पोलिस प्रशासनाच्या दालनात….
तहसीलदारने दिले, पोलिस प्रशासनास चौकशीचे आदेश...
मोफत उपचाराच्या खोट्या जाहिराती देऊन रुग्णांची फसवणूक करणाऱ्या पंढरपुरातील लाईफलाईन हॉस्पिटलची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचे निषेधार्थ व पीडित रुग्णास न्याय मिळवून देण्यासाठी सम्यक क्रांंती मंचाचे अध्यक्ष प्रशांत लोंढे यांचे मागील तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. या आंदोलनाबाबत मा. जिल्हा शल्य चिकित्सक प्रदिप ढेले यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आणि तहसील कार्यालयातील चौकशी कार्यप्रणालीबाबत निषेध नोंदवीत आमचे आमरण उपोषण पुढील कारवाईसाठी संबंधितांकडे दाद मागण्याचा आमचा हक्क अबाधित ठेवत, तात्पुरते स्थगित केले आहे. त्याची सविस्तर माहिती अशी दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी आमरण उपोषणाचा तीसरा दिवस असता दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयातून बोलावणे आल्याने आमचे शिष्टमंडळ तहसीलदार यांच्या कार्यालयात गेलो असता तेथे लाईफलाईन हॉस्पिटलचे डाॅ संजय देशमुख, वैद्यकीय अधिक्षक उप जिल्हा रुग्णालय सौ.ढवळे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डाॅ वाघमारे आणि पंढरपूर शहर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण पवार उपस्थित होते. त्याच्या समक्ष रुग्णालयाने मोफत उपचाराची जाहीरात दिलेली आहे व रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे घेतल्याचे कबूल केले. शिष्टमंडळानेही आपली बाजू मांडली, परंतु तहसीलदार लाईफलाईन हॉस्पिटलची पाठराखण करत असल्याचे निदर्शनास आल्याने शिष्टमंडळ तहसीलदार यांच्या कार्यालया बाहेर येऊन निर्णयाची वाट पाहत उभे राहिले. दरम्यान सम्यक क्रांती मंचचे संस्थापक सदस्य सिद्धार्थ जाधव यांनी दुपारी 3:20 वाजण्याच्या सुमारास जिल्हा शल्य चिकित्सक प्रदिप ढेले यांच्या 9423075732 या मोबाईलवर संपर्क साधून सम्यक क्रांती मंचच्या मागणी संबंधित वस्तुस्थितीचा विपर्यास होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले असता, त्यांनी “सध्या कोरोना प्रादुर्भाव वाढत असून आमच्यावर कामाचा ताण अधिक असल्याने आपण आम्हाला चौकशी करण्यासाठी आणखी थोडा वेळ द्यावा. आपल्या मागणी संबंधी आम्ही लवकरच चौकशी करून कारवाई करु, आपण आपले आमरण उपोषण स्थगित करावे” अशा प्रकारचे आवाहन केले. दरम्यान तहसील कार्यालयातील कर्मचारी कोळी हे लाईफलाईन हॉस्पिटलचे डाॅ संजय देशमुख आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डाॅ वाघमारे हे चर्चा करित कारवाई अहवालाचे टंकलेखन करत असल्याचे कार्यालया बाहेर उभे असलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा संबंधित संशयास्पद प्रकाराच्या कथनावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असे वाटल्याने शिष्टमंडळातील एका सदस्याने हा गैरप्रकार आपल्या मोबाईलमध्ये प्रत्यक्षात चित्रित केला. या प्रकाराबाबत कर्मचारी कोळी यांच्याशी विचारणा केली असता, शेजारी बसलेले डाॅ संजय देशमुख आणि डाॅ वाघमारे यांना मी ओळखत नाही. ते येथे का आले, हे ही माहित नाही. मी तहसीलदार मॅडम यांनी सांगितलेल्या कारवाई अहवालाचे टंकलेखन करित होतो, असे सांगितले. या बाबत आम्ही तात्काळ तहसीलदार मॅडम यांच्याशी या गैरप्रकाराबाबत बोललो असता, डाॅ देशमुख आणि डाॅ वाघमारे हे कार्यालयात काय करत होते, हे मला माहीत नाही. ते कर्मचारी कोळी यांना विचारा, असे उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे तहसील कार्यालयावर आमचा विश्वास राहिला नाही. संबंधित चित्रिकरण योग्यवेळी योग्य त्या सक्षम अधिका-याकडे सादर करण्यात येईल व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. तथापि जिल्हा शल्य चिकित्सक प्रदिप ढेले यांच्या आवाहनास प्रतिसाद देत आमचे आमरण उपोषण स्थगित केले आहे. आमरण उपोषणा संबंधी तहसीलदार यांनी दिलेल्या पत्रानूसार कारवाई करण्याबाबत पंढरपूर शहर पोलिस प्रशासनास सुचना दिल्या आहेत तसेच त्यांनी आम्हास दिलेल्या निर्देशानुसार आम्ही सबळ कागदोपत्री पुराव्यास पंढरपूर शहर पोलिस स्टेशन यांचेकडे लवकरच तक्रार दाखल करत आहेत. अशी माहिती उपोषणकर्ते प्रशांत लोंढे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…