आगलावेवाडीत डाक विभागाच्या‘पंचतारांकित ग्राम’ योजनेचा प्रारंभ
पंढरपूर दि(11):- पंढरपूर डाक विभागातील आगलावेवाडी ता: सांगोला या गावामध्ये ‘पंचतारांकित ग्राम’ योजनेचा प्रारंभ केंद्रीय दूरसंचार व दळणवळण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे दि.10 सप्टेंबर रोजी करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत प्रशासक मिलींद सावंत, पंढरपूर डाक विभागाचे अधिक्षक एन. रमेश, ग्रामसेवक कुमार शिंदे, सहायक अधिक्षक आर. बी.घायाळ, डाक निरीक्षक एस. आर. गायकवाड तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे भारतीय डाक विभागाचे सचिव प्रदीप्त कुमार बिसोई, डायरेक्टर जनरल विनीत पांडे उपस्थित होते
‘पंचतारांकित ग्राम’ योजनेसाठी आगलावेवाडी ता: सांगोला या गावाची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय डाक विभागाच्या विविध पाच प्रकारच्या योजना या गावातील प्रत्येक घराघरात पोहोचविण्याचा आणि त्याद्वारे केंद्र सरकारच्या आर्थिक समावेशकतेच्या धोरणामध्ये ग्रामीण जनतेस समाविष्ट करून घेणे हा या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये बचत बँकेच्या विविध योजना, मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना, इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते, टपाल जीवन बिमा आणि ग्रामीण टपाल जीवन बिमा तसेच प्रधानमंत्री सुरक्षा आणि ग्राम जीवन ज्योती बिमा योजना या राबविण्यात येणार आहेत.
भारतीय डाक विभागाच्या ‘पंचतारांकित ग्राम’ या योजनेत जास्ती जास्त नागरिकांनी सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन अधिक्षक एन. रमेश यांनी केले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…