शेतजमिनीच्या वाटणीच्या वादातून सख्या भावानेच पेटवला भावाचा उसाचा फड
खेडभोसे येथील भारत भगवान पवार विरोधात करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शेतीच्या वाटपाच्या धुमसत असलेल्या वादातून आपला सख्या भावाने आपल्या शेतजमिनीतील १ एकर उसाचा फड पेटवून दिल्याची फिर्याद खेडभोसे येथील शेतकरी गुलाब भगवान पवार यांनी भाऊ भारत भगवान पवार याच्या विरोधात करकंब पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या बाबत दाखल फिर्यादी नुसार
फिर्यादी गुलाब भगवान पवार हे पत्नी सखुबाई,दोन मुले राजेंद्र व प्रशांत तसेच भाऊ भिमराव,सत्यवान ,भारत व त्याचे पत्नी व त्याची मुले असे एकत्रीत राहणेस आहे. फिर्यादीची शेती खेडभोसे हद्दीत असुन तिचा गट नं 274/1/ब/1असा असुन तेथे फिर्यादीच्या नावावर एक हेक्टर वीस गुंठे जमिन आहे. त्यामध्ये सध्या दहा हजार एक या जातीचा जुलै 2019 मध्ये लावलेले ऊसाचे पिक आहे. फिर्यादीचा सख्खा भाऊ भारत भगवान पवार याचेत शेतजमिनीच्या वाटणीवरून वाद आहे. त्यामुळे सतत वाद होतात. दि. 03/09/2020रोजी सकाळी 11/30 वाचे सुमारास फिर्यादी टेंभूर्णी येथे ट्रँक्टरचे कामानिमित्त गेला असता भावजय संगिता हणुमंत पवार रा खेडभोसे ता पंढरपुर हिने फोन करून सागितले की तुमच्या शेतातील ऊस पेटलेला आहे त्यावेळी भारत भगवान पवार हा तुमच्या ऊसातुन बाहेर येताना मी पाहीले आहे तुम्ही लवकर या असे कळविले.फिर्यादीने लागलीच मुलगा राजेंद्र यास फोन करून सांगितले आपला ऊस भारत भगवान पवार यांने पेटवला आहे. तु तेथे लवकर जावुन पेटलेला ऊस विझव असे सांगितले. ऊसाचे शेतात जावुन पाहीले असता तेथे एक एकर ऊस जळुन सुमारे 1,00,000/-रुपयाचे नुकसान झालेचे दिसले.या प्रकरणी भारत भगवान पवार रा खेडभोसे ता पंढरपुर याने माझी जमीन गट नं 274/1/ब/1 मधील दहा हजार एक या जातीचा जुलै 2019 मध्ये लावलेल्या ऊसापैकी एक एकर ऊसाचे पीक पेटवुन देवुन सुमारे 1,00,000/- रुपयाचे नुकसान केले आहे अशा आशयाची फिर्याद गुलाब भगवान पवार यांनी दाखल केली आहे.