Categories: Uncategorized

पंढरपुर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा आडमुठेपणा, मंदिर उघडणार नसल्याचे काढले पत्रक, बाळासाहेब आंबेडकरांनी दिली प्रतिक्रिया

पंढरपुर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा आडमुठेपणा, मंदिर उघडणार नसल्याचे काढले पत्रक, एँड.बाळासाहेब आंबेडकरांनी दिली प्रतिक्रिया

पुणे, दि, २ – राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करावीत म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर या ठिकाणी मोठे जनआंदोलन केले होते. या प्रकरणात प्रकाश आंबेडकरां सहित बाराशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. केवळ सामाजिक भावनेतून हे आंदोलन करण्यात आले असले तरी आता मात्र यात राजकारण केले जात आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष यांनी एक पत्रक काढले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की ३० सप्टेंबर पर्यंत मंदिर उघडण्यात येणार नाही. मंदिर समितीचा आडमुठेपणा लोकांच्या जनभावनेच्या विरोधात असल्याची चर्चा आता केली जात आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत मांडले.
विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर त्याचप्रमाणे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी एक पत्रक काढले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की ३० सप्टेंबर पर्यंत मंदिर उघडण्यात येणार नाही. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने हे पत्रक का काढले याबाबत आपल्याला जाणीव नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मात्र मंदिर उघडायचे की नाही उघडायचे हा शासनाचा निर्णय असतो शासनाने आम्हाला दिलेला शब्द पाळतील व राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago