पंढरपुरात समन्वय अधिकारी नेमा : पालकमंत्री भरणे

पंढरपुरात समन्वय अधिकारी नेमा : पालकमंत्री भरणे

कोविड आणि नॉन कोविड रुग्णांवर वेळीच उपचारासाठी उपाययोजना

               पंढरपूर.दि.29: कोविड बाधित आणि नॉन कोविड रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत यासाठी समन्वय अधिकारी नेमावा अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पंढरपूर येथे दिल्या.

               कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाला आळा घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज पंढरपूर येथे बैठक झाली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.बैठकीस आमदार भारत भालके, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.  ही बैठक 65 एकर परिसरातील एमटीडीसीच्या हॉल मध्ये घेण्यात आली.

              आमदार भालके यांनी  कोविड विषाणूची बाधा झालेले आणि न झालेल्या रुग्णांवर वेळीच उपचार होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. काही खाजगी डॉक्टरांकडून सामान्य रुग्णांवर उपचाराला नकार दिला जातो. त्यामुळे  सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय उपचारा पासून मुकावे लागत आहे. यावर तोडगा काढला जावा, असे त्यांनी सांगितले. यावर समन्वय अधिकारी नेमला जावा. त्याने कोविड बाधित रुग्णांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहेत, आणि अनुषांगिक माहिती नागरिकांना उपलब्ध करुन द्यावी अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

               पंढरपूर येथे 65 एकर परिसरात उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटर मधून कोरोना बाधित रुग्णांच्या वेळीच उपचार होतील. या सेंटरला आणि तालुक्यातील शासकीय रुग्णालयांना आवश्यकती मदत आणि निधी  जिल्हा प्रशासन व राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला जाईल असेही,श्री भरणे यांनी सांगितले. कोविडच्या कालावधित चांगले काम करणाऱ्या आशा वर्कर यांच्या मानधनाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

              श्री. शंभरकर यांनी जिल्ह्यातील सर्व  डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल, कोविड केअर हॉस्पिटल यांना आक्सिजनचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून सर्व ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा वेळेत होईल. कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटल येथे आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि औषधे पुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. पंढरपूर येथे लवकरच समन्वय अधिकारी नियुक्त केला जाईल असे त्यांनी सांगितले.

              कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या  विविध उपाययोजना व सोयी, सुविधांची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी दिली.

             यावेळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, डॉ.केचे आदी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

1 week ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

2 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

3 weeks ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

4 weeks ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

1 month ago