पंढरपुरातील ६५ एकर परिसरात कोविड केअर सेंटर सुरु                                       गरीब, अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना उपचारासाठी लवकरच हॉस्पिटल

पंढरपुरातील ६५ एकर परिसरात कोविड केअर सेंटर सुरु

 

गरीब, अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना उपचारासाठी लवकरच हॉस्पिटल

 

           पंढरपूर, दि.26 :-  कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने 65 एकर मधील एमटीडीसीच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी लवकरच  गरीब व अल्प उत्पन्न गटातील कोरोनाबाधित रुग्णांच्या  मोफत उपचारासाठी सर्व सोयी सुविधायुक्त डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

         पंढरपूर नगरपरिषद, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आरोग्य विभाग यांच्या सहकार्यातून 65 एकर मधील एमटीडीसीच्या इमारतीमध्ये नगरपरिषदेच्या वतीने सुसज्ज व सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षिका डॉ. जयश्री ढवळे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, डॉ. प्रदिप केचे, डॉ.धोत्रे, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

     यावेळी प्रांताधिकारी ढोले म्हणाले, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे आणखी आवश्यक निधीची मागणी केली  आहे. जिल्हाधिकारी मिलींद शंभर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 29 लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला आला आहे. या निधीतून डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलसाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनांची खरेदी करण्यात येणार आहे.  येथे गरीब व गरजू रुग्णांनाच्या  उपचारासाठी अत्याधुनिक मोफत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

         तालुक्यात ग्रामीण भागात रुग्णांची  संख्या वाढत असताना महात्मा फुले जन आरोग्य यांजनेतंर्गत उपलब्ध होणारे बेड हे अत्यंत कमी प्रमाणात असल्याने ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांवर उपचार करण्यासाठी 65 एकर मधील सर्व सोयी सुविधायुक्त कोविड केअर सेंटरचा उपयोग होणार असल्याचेही प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.

          यावेळी मुख्याधिकारी मानोरकर म्हणाले, या  कोविड केअर सेंटरमध्ये  नगरपरिषदेच्या वतीने रुग्णांना आवश्यक व  चांगली सुविधा देण्यात येणार आहे. गरीब व गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

          कोविड केअर सेंटर मध्ये ऑक्सिजनची सुविधा असणारे 50 बेडची  व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच येथे कार्यरत असणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना राहण्याची स्वंतत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटर साठी  आयएमए संघटनेकडून 30 बेड व नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडून 20 बेड व 100 पिपीई किट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago