पंढरपूरः कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाची परीक्षा लांबणीवर पडली आहे. असे असले तरी गोपाळपूर येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा फार्मसी कॉलेजचा प्रथम वर्षाचा निकाल नुकताच लागलेला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एम.एस.बी.टी.ई.) ने जाहीर केलेल्या निकालात स्वेरी संचलित डी. फार्मसीचा निकाल शंभर टक्के लागला असून शुभांगी कनकी यांनी महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
पंढरपूर परिसरातील विद्यार्थ्यांना डिप्लोमा फार्मसीच्या शिक्षणासाठी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर अशा मोठया शहरात जावे लागत होते. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय पाहून व त्याचबरोबर संस्थेच्या शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांनी पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकांच्या फार्मसीकरीता असणाऱ्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर १५ वर्षापुर्वीच डी.फार्मसी कॉलेजची स्थापना केली. विद्यार्थ्यांनी देखील यशाची परंपरा कायम राखल्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष डिप्लोमा फार्मसी परीक्षेमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक शुभांगी अमरनाथ कनकी (९४.८३ टक्के), द्वितीय क्रमांक प्रतीक्षा शिवाजी क्षीरसागर (९३.७३टक्के), तृतीय क्रमांक विश्वजित लक्ष्मण कदम (९३.५५ टक्के) यांनी मिळविले तर अकरा विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण मिळविले. यशस्वी विद्यार्थ्याना प्राचार्य प्रा. सतिश मांडवे यांच्यासह प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक-सचिव डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.
पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…