एकलासपूर येथील पीठ गिरणी चालकाला लाचेची मागणी
महावितरणचा कंत्राटी वायरमन एसीबीच्या जाळ्यात
आकडा टाकून वीज वापरत असल्याचे तपासणी वेळी उघड झाल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी एकलासपूर तालुका पंढरपूर येथील पीठ गिरणी चालक आकाश ताड याच्याकडे ६ हजाराच्या लाचेची मागणी करणारा कंत्राटी वायरमन पांडुरंग अनिल दांडगे, वय 26वर्षे, कंत्राटी तंत्रज्ञ/वायरमन, रा. कोंढारकी ता. पंढरपुर हा लाच लुचपत विभागाच्या सापळ्यात रंगेहाथ सापडला असून या घटनेमुळे महावितरण मधील लाचखोरी पुन्हा चर्चेत आली आहे.
या बाबत दाखल फिर्यादीनुसार सविस्तर वृत्त असे कि, ११ ऑगस्ट २०२० रोजी सदर प्रकरणातील आरोपी वायरमन दांडगे हे फिर्यादीच्या एकलासपूर येथील पिठाच्या गिरणीच्या ठिकाणी तपासणी साठी गेले असता त्यांना सदर फिर्यादी याने आकडा टाकून वीज घेतल्यास निदर्शनास आले.या वेळी वायरमन दांडगे यांनी फोटो काढला व कारवाई करण्यात येईल असे सांगितले. दांडगे वायरमन हे फिर्यादीकडे आले व केस न करण्यासाठी म्हणुन 8,000/-रु. मडमना देण्यासाठी दया अशी मागणी केली. यावेळी फिर्यादीने जवळ रोख असलेली रक्कम 1,500/-रु. दिले व वडीलांचा मो.नं. 9881589851 वरुन वायरमन दांडगे यांचे मो.नं. 8975574772 वर गुगल पे द्वारे 500/-रु. पाठउन दिले होते.नंतर काही दिवसानंतर वायरमन दांडगे हे फिर्यादीला भेटले व उर्वरीत 6,000/-रु. ची मागणी केली.दि. 20/08/2020 रोजी 13.50 ते 15.50 या दरम्यान पांडुरंग अनिल दांडगे यांनी उर्वरीत 6,000/-रु. लाच मागणी अनवली गावातील तळयाजवळ करुन, ती लाच रक्कम प्रेमाचा चहा कँटीन, सावरकर चौक, पंढरपुर येथे स्विकारुन सांपत्तीक फायदा मिऴवुन गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन केले आहे, म्हणुन फिर्यादी आकाश सुभाष ताड यांनी पांडुरंग अनिल दांडगे, वय 26वर्षे, कंत्राटी तंत्रज्ञ/वायरमन, रा. कोंढारकी ता. पंढरपुर जि.सोलापुर यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये फिर्याद दाखल केली आहे.