पंढरीतील होडी चालकांना अत्यावश्यक किराणा मालाचे वाटप; होडी चालक मालक कल्याणकारी संघाचा स्तुत्य उपक्रम

पंढरीतील होडी चालकांना अत्यावश्यक किराणा मालाचे वाटप;
होडी चालक मालक कल्याणकारी संघाचा स्तुत्य उपक्रम
पंढरपूर (प्रतिनिधी):- कोरोनाच्या संकटामुळे गोरगरीबांचे व हातावरचे पोट असलेल्या सर्वसामान्यांचे जगणे मुश्किलीचे बनले आहे. या काळात गोरगरीबांना शासनाकडून भरीव आर्थिक सहकार्य मिळत नाही. परंतु कांही सामाजिक संघटनांचा मदतीचा हात सर्वसामान्यांना मिळताना आढळत आहे. अशाच प्रकारचे मोठे कार्य पंढरीतील होडी चालक मालक कल्याणकारी संघाने केले आहे. नुकतेच पंढरीतील होडी चालकांना महालक्ष्मी सणाच्या पार्श्‍वभुमीवर संघाच्या वतीने अत्यावश्यक किराणा मालाचे वाटप करण्यात आले.

कोरोनामुळे पंढरीतील होडी चालकांचा व्यवसाय ठप्प आहे. होडी व्यवसायावर उदरनिर्वाह करणारे अडीचशेच्या वर होडी चालक आहेत. याचबरोबर होडीवरील कामगार अशा सर्वांच्या कुटुंबियांवर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे. कोरोनाच्या संकटकाळात या सर्वांना कोणतेही आर्थिक सहकार्य मिळालेले नाही. या सर्वांचे संसार मोडुन पडलेत; परंतु यांच्याकडे शासनाचे लक्ष नाही. अशा परिस्थितीत गौरी-गणपतीचा सण तोंडावर आलेला असताना होडी चालक मालक कल्याणकारी संघाकडून सर्व होडी चालकांना अत्यावश्यक किराणा मालाचे वाटप करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सतीश हरिभाऊ नेहतराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन, सॅनिटायझर, मास्क चा वापर व सोशल डिस्टन्सचा अवलंब करुन हे वाटप करण्यात आले. साखर, हरभरा दाळ, मैदा, रवा, गोडे तेल, डालडा, विविध मसाले अशा प्रकारचा किराणा माल देण्यात आला. यावेळी गणेश तारापुरकर, हरिभाऊ नेहतराव, रमेश नेहतराव, सोमनाथ अभंगराव, राजु सलगरकर, बाबासाहेब अभंगराव, उमेश प्रकाश संगीतराव, अमर परचंडे, महर्षी वाल्मिकी संघाचे शहराध्यक्ष सुरज अरुण कांबळे, सुनील अभंगराव, संजय कोळी, वैभव माने, गणेश तारापुरकर, लक्ष्मण अधटराव, महेश (भैया) अभंगराव, महेश वाघमारे, राहुल अभंगराव, बसाप्पा हुग्गी, राजु बळवंतराव, प्रविण कांबळे, विठ्ठल करकमकर, श्रीकांत बळवंतरावसचिन अभंगराव, मंगेश अभंगराव आदी मान्यवर तसेच कोळी समाज बांधव उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago