अखेर नारायण चिंचोली येथील ‘ते’ बेकादेशीर भूखंड वाटप रद्द
उपजिल्हाधीकारी पुनर्वसन यांनी दिले आदेश
पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे पुनर्वसन झालेल्या लोकांसाठी गावठाण वसलेले आहे. या ठिकाणी या ठिकाणी अनेक विस्थापित रहात असून तसेच काही जणांच्या खुल्या जागा आहेत.येथील खुल्या जागांवर तालुक्यातील काही दलालांचा डोळा होता.त्यांनी हे भूखंड आधिकार्यास हातास धरून बोगस धरणग्रस्तांच्या नावावर भूखंड मंजूर करण्याचा प्रकार उघडकीस आला होता.या विरोधात बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.याची दखल घेत उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांनी १९ ऑगस्ट रोजी सदर बेकायदा भूखंड वाटप रद्द करण्याचे दुरुस्ती आदेश दिल्याने धरणग्रस्तांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे उजनी पुनर्वसनाचे गावठाण असून भैरवनाथ वाडी गावठाण म्हणून वास्तवास आहे या पुनर्वसन गावठाणात अनेक पुनर्वसन लोक वास्तव्यास आहेत तर काही जणांची मुले व त्यांचे नातेवाईक वास्तव्यास आहेत परंतु या गावठाणातील अनेक भूखंड शिल्लक असून या शिल्लक असलेल्या भूखंडावर धरणग्रस्तांचा हक्क असून या धरणग्रस्तांची भविष्यातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन या गावठाणा मधील भूखंड शासन नियमाप्रमाणे नियमित करावे यासाठी येतील ग्राम प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात होता. मात्र सदर नारायण चिंचोली येथील गावठाणातील उर्वरित भूखंडाचे बोगस धरणग्रस्त दाखवून पुनर्वसन अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही अधिकारी व तालुक्यातील दलाल भूखंड लाटण्याचे प्रकार करीत आहेत त्यावर जिल्हाधिकारी व जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी सखोल चौकशी करून येथील धरणग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केलेली होती.
धरणग्रस्तांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी उपोषणाचा इशारा देण्यात आल्यामुळे जिल्हा पुनर्वसन अधीकारी यांनी याची तत्काळ दखल घेत नव्याने आदेश निर्गमित केले आहेत.त्यामुळे धरणग्रस्तांच्या जागांवर डोळा असणाऱ्या दलालांचे मात्र धाबे दणाणले आहेत.