*आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांना कोरोनाची लागण

आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांना कोरोनाची लागण

नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आरोग्यसमिती सभापती विवेक परदेशी यांना कोरोनाची लागण झाली होती.त्यांच्या तब्येती मधे सुधारणा होत आहे. ते आता लवकरच जनतेच्या आरोग्य सेवेस पुन्हा रुजु होणार आहेत.
        गेल्या सहा महिन्यांपासुन आमदार प्रशांतराव परिचारक, प्रांताधिकारी सचीन ढोले,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती परदेशी यांनी आरोग्य विषयक नियोजनबद्ध काम केले. शहरामध्ये कोरोना बरोबर साथीचे रोग नियंत्रणात आणण्यासाठी विविध स्तरावर नवनवीन उपाययोजना आखल्या व  अंमलात आणल्या.आरोग्य सभापती पद स्विकारल्या पासुन शहरातील विविध भागात जाउन जनजागृती करणे, रुग्णांना मदत करणे, जनतेचे आरोग्य विषयक प्रश्न सोडवणे, सफाई कर्मचारी आणी आरोग्य कर्मचारी यांच्या अडीअडचणी सोडवणे हा
त्यांचा नित्यक्रम ठरला होता. तसेच कोरोना विषयक सोशल मिडियाद्वारे जनजागृती करण्याबरोबर आरोग्य विषयक नवनवीन माहिती त्यांनी नागरिकांना दिली. आरोग्य विभागाचे काम अत्याधुनिक आणि तात्काळ व्हावे यासाठी स्वतः लक्ष घालुन अमुलाग्र बदल केले. निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने नगरपालिकेस बॅटरी वरील ८ ऑटोमॅटिक इलेट्रॉनिक मशीन उपलब्ध करून दिल्या. यामुळे कमी वळेत जास्त काम होत आहे.नगरपालिकेचे दवाखान्यासाठी स्वखर्चाने पीपीई किट उपलब्ध करुन दिले तसेच नागरिकांच्या सेवेसाठी काम करणाऱ्या सर्व कर्मचारीं, नगरपालिका आरोग्य कर्मचारी यांना प्रतिकारशक्ती वाढणारी अर्सेनिक अल्बम ३० हे औषध घरोघरी जाऊन दिले आहे. सभापती परदेशी यांनी अहोरात्र स्वतःला झोकून देउन नागरिकांसाठी काम केले.त्याच्या कार्यामुळे आरोग्य विभागात नवचैतन्य निर्माण झाले.
            शुक्रवार दि.७ ऑगस्ट रोजी परदेशी नगर येथे परेदेशी क्लिनीक मध्ये रॅपिड अँटीजन टेस्टच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.  या कँप मध्ये प्रांतधिकारी सचीन ढोले यांनी सपत्निक स्टेस्ट केली. त्यानंतर आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांनी ही टेस्ट केल्यानंतर त्यांचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला. उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी तात्काळ होम कॉरंटाइन होण्यास सांगितले. शासनाच्या निर्देशाचे पालन करुन सभापती परदेशी क्वारंटाइन झाले.यानंतर प्रांत साहेब, मुख्याधिकारी साहेब, नगराध्यक्षा, आमदार प्रशांतराव परिचारक, आई वडिल, मित्र नातेवाईक , नगरसेवक यांनी मोबाईल द्वारे परदेशी यांना धीर दिला. ते अद्याप डॉक्टरांच्या सल्यानुसार औषध उपचार घेत असुन, त्यांनी सांगितल्या प्रमाणे ७ दिवस घरी व ७ दिवस डॉक्टरांच्या ऑबझर्व्हेशन मध्ये राहिले आहेत व कोरोनाची दुसरी चाचणी दिली आहे त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. श्रीगुरुंच्या कृपेने, सर्व नागरिक, आई वडील, मित्र नातेवाईक या सर्वांच्या आशीर्वादाने ते व्यवस्थित आहेत. आहे व लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजु होणार असल्याचे श्री परदेशी यांनी सांगितले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

2 days ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

3 days ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 week ago

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ समाधान आवताडे

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…

1 week ago

चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतुन माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

१२ ऑक्टोबर पासून ५ दिवस कृषी,कृषी उद्योग मार्गदर्शन,प्रदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन…

2 weeks ago