धाराशिव साखर कारखानाकडून पोळा सणासाठी दुसरा हाफ्ता २००रू ने जाहिर : चेअरमन अभिजीत पाटील

धाराशिव साखर कारखानाकडून पोळा सणासाठी दुसरा हाफ्ता २००रू ने जाहिर :- चेअरमन अभिजीत पाटील

उस्मानाबाद जिल्ह्य़ात नावलौकिक असलेल्या चोराखळी ता कळंब येथील धाराशिव साखर कारखाना युनीट १ या साखर कारखान्याने गेल्यावर्षी सन २०१९-२० गळीत हंगामात शेतकरी सभासदांनी दिलेल्या ऊसाला पहिला हफ्ता म्हणून २१००रू. दिला होता.
तर दुसरा हाफ्ता पोळा सणासाठी २००रू देण्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी घोषित केले आहे.

सन २०१९ -२० उस गाळपास पाठविलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला एफआरपी पेक्षा जास्त दर देणार असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी घोषित केले होते. दिलेला शब्द पाळत कोरोनाच्या संकटात आर्थिक अडचणीत शेतकरी आला असल्याने शेतकर्याना आर्थिक आधार मिळणार आहे. यंदा पाऊसकाळ चांगला असल्यामुळे या पैशातुन पोळा , लक्ष्मी, गणपती सणास जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास, उसाची जोपासणूक करून खत तसेच पिकावरील फवारण्या करण्यास या पैशाचा फायदा होणार आहे .कारखाना नेहमी कर्मचारी आणि शेतकरी सभासदाचे हिताचे निर्णय घेत असून सर्वांच्या सुख दुःखात नेहमी डीव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील सहभागी असतात.
शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात दुसऱ्या हप्त्याचे दोनशे रुपयाचे चेक घरपोच मिळतील असे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.

तसेच सन २०१८- १९ एफआरपी पेक्षा जास्त दर देऊन मागील १०० रूपये शेतकऱ्यांना देऊन आपला शब्द खरा केला आहे.
अंतीम बिल पोहच केल्या बद्दल उस उत्पादक शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

16 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago