अकलूजचे कोविड हॉस्पिटल राज्यासाठी आदर्श ठरेल – पालकमंत्री

अकलूजचे कोविड हॉस्पिटल राज्यासाठी आदर्श ठरेल

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन

            पंढरपूर, दि.16 : कोरोना बाधित रुग्णांना वेळेत व योग्य उपचार मिळावेत  यासाठी अकलूज येथे इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटना यांच्या माध्यमातून  उभारण्यात आलेले  कोविड हॉस्पिटल संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरेल असे, प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

            इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटना यांच्या माध्यमातून  सुसज्ज कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी  उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते,. उपसभापती अर्जुनसिंह मोहिते -पाटील, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ,  प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजित पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भिमाशंकर जमादार,  जिल्हाशल्यचित्सक डॉ.प्रदिप ढेले, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते, डॉ.नितीन एकतपुरे,  डॉ.एम.के.इनामदार उपस्थित होते.

            श्री. भरणे म्हणाले, इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटनेच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी  सुसज्ज व सोयीसुविधायुक्त  100 बेडचे कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. नागरिकांना येथे योग्य व चांगले उपचार मिळतील.हे कोविड हॉस्पिटल शासननिर्णयाच्या दरानुसार चालविण्यात येणार असल्याने सर्वसामन्य नागरिकांनीही याचा चांगला उपयोग होईल.  सर्व संस्था व संघटना  सामाजिक बांधलिकी ठेवून काम करत आहेत.  अकलूज येथील कोविड हॉस्पिटलसाठी लागणारे आवश्यक ते सहकार्य शासनाच्यावतीने करण्यात येईल.

          जिल्हातील कोरोना संसर्गरोखण्यासाठी  जिल्हा प्रशासन व  संबधित यंत्रणा समन्वायाने काम करीत आहे. कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी अकलूज येथील सर्व खाजगी डॉक्टरांच्या माध्यमातून डेडीकेडेड कोविड हॉस्पिटल सुरु केले आहे. या हॉस्पिटल मध्ये रुग्ण  सेवा यांच्यामार्फतच केली जाणार आहे. या हॉस्पिटल मुळे तालुक्यातील तसेच परिसरातील नागरिकांना उपचारासाठी फायदा होणार आहे. रुग्णावरील उपचाराचे दर हे शासन निर्णयानुसारच आकारण्यात येणार आहेत. तसेच हे कोविड हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत कार्यवाही करावी, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.  

          कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी अकलूज येथील सर्व खाजगी डॉक्टरांनी सर्व सुविधयुक्त 100 बेडचे कोविड हॉस्पिटल सुरु केले असून हे राज्यातील पहिले हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचारा बरोबरच त्यांचे समुपदेशन करण्यात येवून त्यांचे मनोबल वाढविण्यात येणार आहे. या हॉसिपटलचा अकलूज व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.

        इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटनेशी संबंधित  150  खाजगी डॉक्टरांनी  एकत्रित येवून येथे 20 बेड व्हेंटिलेटर व 80 बेड ऑक्सिजन सुविधा असणारे बनविण्यात आले आहे. हे हॉस्पिटल शासनाच्या नियमानुसार व दर प्रणालीनुसार चालविण्यात येणार  असून, रुग्णांना सर्व  सेवा संघटनेमार्फत देण्यात येणार असल्याचे  इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन एकतपुरे यांनी सांगितले.

          यावेळी प्रांताधिकारी शमा पवार यांनी माळशिरस तालुक्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाय योजनेची माहिती दिली. शासनाच्या वतीने एक हजार पीपीई किट तसेच मास्कचे वाटप श्री.  भरणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago