कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रथम वर्ष फॅसिलिटेशन सेंटरमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेस सुरवात

कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रथम वर्ष फॅसिलिटेशन सेंटरमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेस सुरवात.

 शेळवे ता. पंढरपूर येथील श्री. पांडूरंग प्रतिष्ठान संचलित, कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठी फॅसिलिटेशन सेंटर क्र. 6447 ची मान्यता मिळाली असून सोमवार दि १० ऑगस्ट २०२० पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया मंगळवार दि. २५ ऑगस्ट २०२० पर्यंत चालणार आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. कणसे. ए. बी यांनी दिली. 
प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठी दि. १० ते २५ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे व कागदपत्रांच्या मुळप्रति अपलोड करणे, दि. ११ ते २५ ऑगस्ट पर्यंत कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती करणे, दि. २८ ऑगस्ट पर्यंत संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे, दि. २९ ते ३१ ऑगस्ट पर्यंत गुणवत्ता यादी मध्ये चुका असल्यास दुरुस्ती करणे व २ सप्टेंबर पर्यंत अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र एफ.सी. क्र. 6447 म्हणून मान्यता दिली आहे. पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणारी अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केलेले आहे.
प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशाकरिता दहावी परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही ऑनलाईन प्रक्रिया दि.१० ऑगस्ट २०२० पासून ते दि. २५ ऑगस्ट २०२० सायं ५ वाजेपर्यंत चालणार आहे. याचा लाभ दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे.
डिप्लोमा प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रा. कोरबु आय. जे. – 8888489235
प्रा. पंढरपूरकर एस. एस. – 9146597820
अ‍ॅडमिशनसाठी संपर्क ऑफीस:
कर्मयोगी विद्यानिकेतन,
कर्मयोगी नगर, पाण्याच्या टाकीजवळ, लिंक रोड, पंढरपूर.
श्री. पांडूरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज, शेळवे फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा अधिक तक्ष व सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago