विना अनुदानित शिक्षकांच्या पगारासाठीच्या निधी वितरणास मंजुरी- आ. दत्तात्रय सावंत
राज्यातील २०टक्के अनुदानित शाळा व तुकड्यांवरील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव २०टक्के अनुदानासाठी तसेच १३सप्टेंबर२०१९ला पात्र झालेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांवरील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २०टक्के अनुदान देण्यासाठी ३५० कोटी रुपये निधी वितरण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मा आ दत्तात्रय सावंत यांनी दिली.राज्यात विनाअनुदानित शाळांच्या संदर्भात अनेक वर्ष सुरू असलेल्या लढ्यात अनेकदा निर्णय झाले. परंतु त्याची अंमलबजावणी होत नव्हती. पाठीमागच्या युती शासनाने 19 सप्टेंबर 2016 रोजी राज्यातील विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान दिले. परंतु सदरचा शासन आदेश काढताना नंतरचा टप्पा वाढ शासनाच्या धोरणावर अवलंबून असेल असे जाहीर करून गेली चार वर्ष अनुदानाचा टप्पा वाढवलेला नव्हता. महाराष्ट्रासह जगावर महा भयानक अशा कोरोनाचे संकट आले. या महाभयानक संकटात सापडल्यामुळे अनुदानाचा टप्पा ही मागे पडतो की काय? असा गंभीर प्रश्न शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाला होता, परंतु या महाभयानक संकटामध्ये देखील दि 12 ऑगस्ट 2020 रोजी अर्थमंत्री व शिक्षणमंत्री तसेच संबंधित अधिकारी यांचे बरोबर बैठक होऊन कॅबिनेट बैठकीमध्ये 19 सप्टेंबर 2016 च्या शाळांना वाढीव टप्पा अनुदान, तसेच 13 सप्टेंबर 2019 रोजी अनुदानास पात्र झालेल्या शाळांना टप्पा अनुदान या बाबतीमध्ये निधी वितरणाचा शासन आदेश निर्गमित करून घेणेबाबत मंजुरी दिली. त्यामुळे राज्यातील शिक्षक बांधवांना योग्य तो न्याय मिळण्यास मदत झाली असून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निरंतरपणे मा आ दत्तात्रय सावंत यांनी प्रयत्न केले.
शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अघोषीत प्राथमिक, माध्यमिक आणी उच्च माध्यमिक यांना घोषीत करणे, कमवीच्या 1298 वाढीव पदांना मंजूरी देवून अनुदान देणे, अंशतः अनुदानित अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण देणे, २००५पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेंशन योजनेचा लाभ देणे या मुद्यावरही सुध्दा चर्चा झाली. वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले होते.या बैठकीला शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, मा आ दत्तात्रय सावंत, आ बाळाराम पाटील, आ कपिल पाटील, आ सुधीर तांबे, आ सतीश चव्हाण, मनोज गायकवाड, गजानन खैरे यांच्या सह शिक्षण विभागाचे सचिव वंदना कृष्णा व अधिकारी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…