स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरवात

स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरवात
पंढरपूरः  गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निकला प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र. ६४३७ ची मान्यता मिळाली असून सोमवार (दि १० ऑगस्ट २०२०) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२० पर्यंत चालणार आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. एन. डी.मिसाळ यांनी दिली.
डिप्लोमा सन २०२०-२१ करीता प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे व कागदपत्रांच्या छायांकित प्रति अपलोड करणे (दि. १० ते २५ ऑगस्ट), कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती (दि. ११ ते २५ ऑगस्ट), संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे (दि. २८ ऑगस्ट), गुणवत्ता यादी मध्ये चुका असल्यास दुरुस्ती करणे (दि. २९ ते ३१ ऑगस्ट) व अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे (२ सप्टेंबर) आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.६४३७) म्हणून मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणारी अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे हे डिप्लोमाचे तेरावे वर्ष असून उज्ज्वल यशाची परपंरा कायम राखली आहे. प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशाकरिता दहावी परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही प्रकिया दि.१० ऑगस्ट २०२० पासून ते दि. २५ ऑगस्ट २०२० सायं ५ वाजेपर्यंत चालणार आहे. याचा लाभ दहावी उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घेण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. डिप्लोमा प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा. एस. एस. गायकवाड मोबा.क्र.९८९०५६६२८१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 day ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

6 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

7 days ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

1 week ago