स्वेरी परिवाराकडून लाॅकडाऊनमध्ये वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकीची जपणूक

स्वेरी परिवाराकडून लाॅकडाऊनमध्ये वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकीची जपणूक
पंढरपूर: महाराष्ट्र शासनाचा सामाजिक वनीकरण विभाग व तंत्रशिक्षण विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र’ हे अभियान सध्या सुरू आहे. या अभियानांतर्गत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित अभियांत्रिकी पदवी व पदविका तसेच फार्मसी पदवी व पदविका ही चारही महाविद्यालये उत्स्फूर्तपणे सहभागी होत लॉकडाऊनच्या काळातही  सामाजिक बांधिलकी जपत आहेत. या अभियानाच्या निमित्ताने प्रत्येक कर्मचाऱ्याकडून एक झाड लावण्यात येत आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव तथा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे सर या अभियानाबाबत मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘केवळ शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम न करता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘स्वेरी परिवार’ नेहमीच काम करत आलेला आहे आणि  आज निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ‘एक कर्मचारी एक झाड’ ही संकल्पना राबवून स्वेरी  परिवाराकडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत आहे.’ गतवर्षी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण महामंडळ (ए.आय.सी.टी.इ)
कडून ‘एक विद्यार्थी एक झाड’ या संकल्पने अंतर्गत स्वेरी परिवाराचा विशेष सन्मान करण्यात आला होता. ‘एक कर्मचारी एक झाड’ या अभियानांतर्गत  अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, डॉ. अभय उत्पात, कॅम्पस इनचार्ज प्रा. एम. एम. पवार, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 day ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

6 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

7 days ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

1 week ago