Categories: Uncategorized

रॅपिड ॲटिजेन रॅपिड टेस्ट मोहिमेतंर्गत तीन हजार नागरिकांची तपासणी – प्रांताधिकारी सचिन ढोले

रॅपिड ॲटिजेन रॅपिड टेस्ट मोहिमेतंर्गत तीन हजार नागरिकांची तपासणी – प्रांताधिकारी सचिन ढोले

 

पंढरपूर : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तालुका प्रशासनाने युध्द पातळीवर उपाययोजना केल्या आहेत. याच अतंर्गत दि.7 ऑगस्ट पासूण शहरी व ग्रामीण भागात रॅपिड ॲटिजेन टेस्ट मोहिम  सुरु करण्यात आली.  या मोहिमेतंर्गत पाचव्या दिवशी तीन  हजार  नागरिकांची रॅपिड ॲटिजेन टेस्ट करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात रॅपिड ॲन्टीजेन टेस्टसाठी 12 पथके नेमण्यात आली असून, शहरी भागासाठी चार तर ग्रामीण भागासाठी आठ पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. तपासणीसाठी विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शहरातील निष्कर्ष्, रोहन व निदान या खाजगी पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात  घेण्यात येणाऱ्या ॲन्टीजेन टेस्टमुळे रुग्ण संख्येत काहीशी वाढ होताना दिसत असली तरी रुग्ण सापडणे हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर आहे. कोरोना आजार उपचाराने बरा होणारा आजार असल्याने या आजाराबाबत कोणीही भिती बाळगू नये असे, ही प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.

कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील लक्षणे नसणाऱ्या व सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन करुन गृह अलगीकरण करण्यात येणार आहे. त्यांना दिलेल्या आरोग्य विषयक सूचनांचे पालन करण्यासाठी शहरी भागात वार्डस्तरीय समिती व ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती यांच्या मार्फत लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे श्री ढोले यांनी सांगितले. 

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी खाजगी रुग्णालयांनी आणखीन बेड उपलब्ध करुन द्यावेत. त्याचबरोबर वैद्यकीय सेवा वेळेत मिळवून देण्यासाठी सर्व खाजगी रुग्णालयांनी आवश्यक माहिती डॅश बोर्डवर नोंदवावी अशा सूचनाही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.

तसेच खासगी रुग्णालयांनी जास्तीत जास्त रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन  योजनेअंतर्गत लाभ मिळवून द्यावा, असे आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago