Categories: Uncategorized

स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ! २०३ विद्यार्थ्यांनी मिळवले ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण

स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम !
२०२० च्या उन्हाळी परीक्षेत तब्बल २०३ विद्यार्थ्यांनी मिळवले ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई यांनी घेतलेल्या पॉलिटेक्निकच्या  २०२० च्या उन्हाळी परीक्षेत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) कॉलेजच्या एकूण २०३ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले तर ८० टक्के ते ९० टक्के दरम्यान गुण असणाऱ्या विद्यार्थांची संख्या ३५३ एवढी आहे तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेली सलग तिन वर्षे शंभर टक्के प्रवेश पूर्ण झालेले महाराष्ट्रामधील स्वेरी हे बहुधा एकमेव खाजगी कॉलेज असून उज्ज्वल निकालामुळे स्वेरीचा नावलौकिक महाराष्ट्रभर झाला आहे.
यामध्ये प्रथम वर्ष इलेक्ट्रिकल शाखेमधून प्रथम क्रमांक श्रावणी खर्डे (९९.२५ %), द्वितीय-साक्षी कारळे (९८.३८ %), तृतीय- गायत्री गोरे (९८.२५ %), कॉम्प्यूटर शाखेमधून प्रथम क्रमांक आहिल्या कोकरे (९७.२५ %), द्वितीय निलेश काशीद (९६.८८ %), तृतीय सौरभ साळुंखे (९६.३८ %), सिव्हिल शाखेमधून प्रथम क्रमांक तुळशीदास लोंढे, अस्मिता मोरे व हर्षाली बाबर (९७.९० %), द्वितीय आकांक्षा झाडे (९६.४३ %) तर तृतीय स्वरदा खिस्ते (९४.२१ %), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखेमधून प्रथम क्रमांक प्रिया घाडगे, ऋतुजा जाधव, आकांक्षा माळी (तिघींनाही ९६.१३ %), द्वितीय रेणुका पवार (९५.३८ %), तृतीय वैष्णवी नेटके (९५.२५ %), इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेमधून प्रथम क्रमांक गायत्री गोरे (९८.२५ %), द्वितीय-सुरय्या पठाण (९६.६३ %), तृतीय-वैष्णवी टोणगे (९५.५० %), तर मेकॅनिकल शाखेमधून प्रथम- प्रसाद डोंबे (९८.१३ %), द्वितीय-कोमल पाटील, निकिता यादव, श्रद्धा सरवळे (तिघींनाही ९७.०७ %), तृतीय-अथर्व दोशी (९६.६७ %) अशाप्रकारे गुण मिळवून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. तसेच द्वितीय वर्ष सर्व विभागातून प्रथम- गीतांजली चव्हाण (९८.००% ), द्वितीय- केशव सरडे (९७.८८%) तर तृतीय-सागर विशाल याने (९७.८७ %) गुण मिळविले. प्रथम व द्वितीय वर्षामधून वेगवेगळ्या विषयांमध्ये ९७ व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १२८ आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, तसेच संस्थेअंतर्गत असणाऱ्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

7 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago