रॅपिड अँटीजन टेस्टचा करावा सदुपयोग :आरोग्य सभापती विवेक परदेशी
पंढरपूरामध्ये लॉकडॉउन च्या काळामध्ये जास्तीत जास्त रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात येत आहे. याचाच परिणाम आपणास कोरोना असणारे नागरिक कळत आहेत, समोर येत आहेत. त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात येत आहे. यामुळे कोरोनाची साखळी शोधण्यास व थांबण्यात आपणास यश येइल. सदर नागरिकांना घरामध्ये व्यवस्था असल्यास घरातच आयसोलेशन ची सुवीधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. घरातील जेवण घेउन, औषध उपचार घेउन असे नागरिक काही दिवसात ठणठणीत बरे होतील. गरज भासल्यास अँडमीट ही करावे लागेल. सर्व नागरिक दुकानदार, कामगार , पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी, भाजीपाला विक्रेते आत्यवश्यक सेवेत काम करणारे नागरिकांनी पुढे यावे असे अवाहन करण्यात आले.
सर्व गोष्टी सुरळीत चालु असताना काही नागरिक अनावश्यक ताण घेत असताना निर्दशनास येत आहे. त्या मुळे नुकसान होउ शकते. कोरोनाचा संसर्ग नेमके कोणाला झाला हे सांगणे कठीण आहे कारण ८०% नागरिक असिटेमँटीक असल्याचे सांगितले जात आहे. पण ज्या वेळी आपणास कळते आपण पॉझिटीव्ह आहोत अशावेळी आपल्या सभोतालचे नागरिक मित्र परिवार यांची खुप मोठी जबाबदारी असुन त्यांनी संसर्ग झालेल्या व्यक्तीला अनावश्यक फोन न करता, योग्य तो धिर दिला पाहीजे. घाबरुन कोरोनावर मात करता येणार नाही. सुरक्षीत अंतर ठेउन, मास्क वापरुनच आपणास मार्ग काढायचा आहे. कोणी जर वैद्यकीय सेवेसाठी सोलापूर किंवा पुणे ला गेल्यास आता काही खरे नाही असे न समजता त्यांना ही धीर द्यावा. कोणालाही कोरोनाची बाधा झाल्यास ती त्याची चुक नसुन नजरचुकीने कोणाच्या तरी संपर्कात आल्यामुळे झालेली असते. अशा नागरिकांना आपण योग्य मार्गदर्शन केल्यास, धिर दिल्यास, ते नागरिक आनावश्यक ताण घेणार नाही व संभाव्य धोका टळेल व घरातील सर्व प्रिय सदस्य व मित्र परिवारही सुरक्षित राहील. कोरोना चा संसर्ग झाला म्हणजे काही विशेष झाले हे आपल्या मनातुन काढले पाहीजे. यातील चांगल्या गोष्टी लोकांच्या मनात रुजवणे गरजेचे आहे.
आपल्या सभोताली काही नागरीक कोरोना झाला म्हणजे त्या घराचे काही खरे नाही अशी चर्चा करण्यात आली तर तिथे भितीचे वातावरण निर्माण होते. सदर व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाउ शकते. म्हणून सर्व नागरिकांना अवाहन आहे एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आला म्हणजे काही विशेष झाले असे न मानुन, एकमेकांना सहकार्य करुन, सुरक्षित अंतर ठेउन योग्य मार्गदर्शन करुन आपणास रुग्ण सेवा करावयाची आहे.
तरी मी सर्व नागरिकांना अवाहन करतो कोरोना झाला म्हणजे काही मोठे झाले असे न समजता आपल्या मित्र परिवाराला धिर देउन योग्य मार्गदर्शन त्यांना कोणताही विचार न करता डॉक्टरांनी दिलेली औषधे घेणे,हलका आहार घेणे व पूर्ण विश्रांती घेणे आवश्यक असल्याचे सांगावे. आपण असे केल्यास हीच खरी रुग्ण सेवा होईल व स्वतःचेही संरक्षण होईल.