Categories: Uncategorized

नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे : आमदार भारत भालके यांचे आवाहन

नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे

आमदार भारत भालके यांचे आवाहन

पंढरपूर, दि.08:पंढरपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आमदार भारत भालके यांनी केले आहे.

तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रशासनाच्या वतीने मोफत रॅपिड ॲंटीजेन टेस्टची मोहीम सुरु करण्यात आली आहे, नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी.  कोरोना विषाणूच्या आजाराबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता आरोग्य विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार दक्षता घ्यावी. आजाराबाबत कुठलीही माहिती लपवू नये. स्वत:ची व कुटूंबाची तसेच जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी व कोरोनाचा प्रसार रोखण्यास प्रशासनास सहकार्य करावे, असेही आमदार भालके यांनी सांगितले.

आतापर्यंत सर्वांनी सहकार्य केले आहे. पोलीस यंत्रणा, प्रशासन, आरोग्य सेवा बजावणारे डॉक्टर्स, कर्मचारी यांना असेच सहकार्य कायम ठेवून आपण सर्वजन मिळून या संकटावर मात करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago