नामवंत कीर्तनकार दयाघन महाराज यांनी सांभाळ केलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण ?

नामवंत कीर्तनकार दयाघन महाराज यांनी सांभाळ केलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण ?

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

पंढरपूर येथील नामानंद महाराज यांचे पिठाधिकारी व नामवंत कीर्तनकार दयाघन महाराज यांनी बालपणापासून पुत्रवत संगोपन केलेल्या अल्पवयीन मुलाचे कोणीतरी अपहरण केले असल्याच्या आशयाची फिर्याद दयानंद नामानंद बिल्ले (वय56धंदा -किर्तन भजन रा नामानंद सेवाधाम मठ ,दाळेगल्ली पंढरपुर) यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या बाबत सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार सात वर्षापुर्वी दयाघन महाराज हे अळंदी जि पुणे येथे गेलो असता तेथे त्यांना एक अनाथ मुलगा नामे साईराम राजु डांगे हा मिळुन आला होता. त्यास कोणीही नातेवाईक नसलेने त्यास पालन पोषण करणेचे उद्दशाने आळंदी येथुन पंढरपुर येथे घेऊन येत त्याचे मोठ्या प्रेमाने पालन पोषण करण्यात आले होते .व तेव्हा पासुन तो नामानंद मठात गुन्या गोविंदाने राहत होता. दि 14/07/2020रोजी दुपारी 02/00वा चे सुमारास सदर मुलगा नामे साईराम राजु डांगे (वय17) हा आमचे घराबाहेर उभा होता.मात्र तो घरात लवकर परत आला नाही म्हणुन दयाघन महाराज यांनी त्याचा पंढरपुर शहरात ,आजुबाजुस ,गावोगावी शोध घेतला परंतु तो मिळुन येत नव्हता. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करूनही तो मिळून येत नसल्याने अखेर दयाघन महाराज यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात कोणीतरी कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन पळवुन नेले फिर्याद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

15 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago