वाखरी येथून चोरीस गेलेल्या टिपरचा दोन दिवसात लावला छडा !

वाखरी येथून चोरीस गेलेल्या टिपरचा दोन दिवसात लावला छडा ! 

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची कामगिरी

संशियत आरोपी फरार,शोध सुरु 

पंढरपूर तालुक्यातील बोहाळी येथील रहिवाशी विजय संतोष कोरके (वय २२ रा. लोखंडे वस्ती वाखरी ) यांच्या मालकीचा टाटा कंपणीचा हायवा टिपर नं.MH42 AQ 0655 हा असुन सदर टिपर सोमवार दिनांक १३ जुलै रोजी आपल्या घरासमोर लावून सदर फिर्यादी कोरके कुटूंबीय हे झोपले असता मंगळवार दिनांक १४ रोजी पहाटे ६ वाजता झोपेतून उठल्यानंतर सदर घरासमोर लावलेला टिपर चोरीस गेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. फिर्यादी विजय संतोष कोरके यांनी हि बाब फिर्यादीचे वडील संतोष कोरके यांच्या कानावर घातली व आपला टिपर कोणी तरी चोरून नेला असल्याचे सांगितले.
सदर चोरीस गेलेल्या टिपरचा फिर्यादी आणि फिर्यादीचे वडील यांनी अकलुज, भाळवणी, सोनके, वाखरी, भंडीशेगाव या परिसरात शोध घेतला परंतु सदरचा टिपर मिळुन आला नाही त्यामुळे त्यांनी फिर्यादीच्या मालकीचा  टाटा कंपणीचा हायवा टिपर नं.MH42 AQ 0655 चोरीस गेल्याची फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली व या प्रकरणी नागेश शिवाजी घोडके रा. बोहाळी ता. पंढरपूर यांनी माझ्या व घरातील लोकांच्या संमतीशिवाय चोरुन नेला असावा असा माझा व आमच्या घरच्या लोकांचा त्याचेवरती संशय आहे असे फिर्यादीत नमूद केले. सदर फिर्याद दाखल होताच पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तपास करीत दोन दिवसात गुन्ह्यातील टिपरचा शोध घेत ताब्यात घेतला असून या प्रकरणातील संशियत आरोपी फरार झाला असल्याचे सांगण्यात आले आहे .
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago