अपेक्स हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या बेजबाबदार कृत्याच्या चौकशीचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे आदेश

अपेक्स हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या बेजबाबदार कृत्याच्या चौकशीचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे आदेश

नगर पालिका प्रशासन करणार कारवाई ?

गोरगरिबांना आधूनिक उपचार मिळतील या अपेक्षेने केवळ २ रुपये स्क्वेर फूट दराने दिली होती न.पा.च्या  मालकीची जागा,भाडेकराराची चौकशी करणार ?

पंढरपूर शहरातील अपेक्स हॉस्पिटल हे पुन्हा व्यवस्थापनाच्या वादग्रस्त भूमिकेमुळे चर्चेत आले असून एकीकडे शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांना कोरेन्टीन करून कोरोनाच्या फैलावाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करीत असतानाच आज अपेक्स हॉस्पिटलमधील दोन कर्मचारी स्वाब रिपोर्ट येण्यापूर्वीच घरी पाठवून दाट लोकवस्ती असलेल्या अंबाबाई पटांगण झोपडपट्टी व घोगडें गल्ली परिसरातील लोकांना कन्टेनमेंट झोन मध्ये पाठविण्याबरोबरच या भागातील लोकांच्या जीवितास धोका पोहोचविण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्नच अपेक्स हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने केला आहे.या बाबत आज संपूर्ण पंढरपूर शहरात प्रचंड संताप व्यक्त होत असून या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर कारवाई करावी अशी मागणीही होत आहे.या घटनेचे गांभीर्य ओळखून प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याशी संपर्क साधला असता पंढरपूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांना या बाबत चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती प्रातांधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.      

                या बाबत मिळलेल्या अधिक माहितीनुसार संत रोहिदास चौक येथील एका कोरोना बाधित रुग्णावर या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आल्याचे पुढे आले होते.त्यानंतर प्रशासनाने त्या बाधित महिलेच्या संर्पकात आलेल्या हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचारी यांना एमआयटी येथील कोविड सेंटरमध्ये विलगीकरण करण्याचा आग्रह केला होता.मात्र अपेक्स रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटल मध्येच विलगीकरन करण्याचा आग्रह केला.या सर्व कर्मचाऱ्याचे स्वाब टेस्ट घेण्यात आली.या पैकी अनेक कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट  निगेटिव्ह आला.मात्र आज बाधित आढळलेल्या २ कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट आलेला नसतानाही त्यांना घरी सोडण्यात आले आणि रात्री उशीरा हे दोन कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.मात्र सदर दोन कर्मचारी हे घरी जाण्याबरोबरच अनेकांच्या सम्पर्कात आले आणि या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबरोबरच संपर्कात आलेल्या लोकांची डोकेदुखी वाढली असून हॉस्पिटल व्यवस्थपनाच्या या हलगर्जीपणा बद्दल  एका बाधित रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त करीत यांच्यामुळे आम्हाला कोरेन्टीन होण्याची वेळ आली. आमचा परिसर सील करण्याची वेळ आली. आमचा व्यवसाय आता बंद ठेवावा लागणार आहे आणि आमचे यावरच पोट आहे आता याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करीत कारवाईची मागणीही केली आहे. 

गोरगरिबांना आधूनिक उपचार मिळतील या अपेक्षेने केवळ २ रुपये स्क्वेर फूट दराने दिली होती न.पा.च्या मालकीची जागा, भाडेकराराची चौकशी करणार ? 

अपेक्स हॉस्पिटल हे पंढरपूर शहरातील उच्चभ्रू व मध्यवस्ती समजल्या जाणाऱ्या महावीर नगर परिसरात आहे.या हॉस्पिटलची जागा हि सुमारे ४५ वर्षांपूर्वी नगर पालिकेच्या मालकीची होती आणि मूळचे अकलूज येथील असलेले व परदेशात डॉक्टर होऊन आलेले स्व.डॉ.एच. आर. फडे यांनी या ठिकाणी भव्य व सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याने पंढरपुरात आधुनिक उपचाराची सोय होईल या अपेक्षेने केवळ २ रुपये स्केवर फूट या दराने हि जागा देण्यात आली होती.मात्र डॉ. एच.आर फडे यांच्या निधनानंतर या हॉस्पिटलमध्ये अपेक्स हॉस्पिटल उदयास आले.अपेक्स हॉस्पटिलचे संचालन फडे कुटुंबीय करत नसून त्यासाठी वेगळे व्यवस्थापन कार्यरत आहे अशी चर्चा असतानाच सदर हॉस्पिटलची जागा हि वर्षाकाठी लाखो रुपये भाडेकराराने देण्यात आली आहे अशीही चर्चा आहे.एकीकडे शहर अथवा उपनगरात आपल्या स्वकष्टर्जित मालकीच्या जागेत भाडेकरू ठेवला तर भाडेकरू टॅक्स आकरणाऱ्या नगर पालिकेने अपेक्स हॉस्पिटल व्यवस्थापनास सदर हॉस्पिटलची जागा भाडेकराराने देण्यात आली आहे काय याचीही सखोल चौकशी करणे गरजेचे झाले आहे.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago