कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बेंचची व्यवस्था
सध्याच्या Covid-19 बिकट परिस्थिती मध्ये विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणे शक्य नाही यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाबरोबरचे नाते दुरावत चालले आहे.
तरीही कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये या महामारीचा विचार करून Covid-19 सुरू झाल्या-झाल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, वर्कशीट, व्हिडिओज, पीडीएफ या माध्यमातून ज्ञानदानाचे काम अविरतपणे सुरू आहे. जरी ही शिक्षण प्रक्रिया चालू असली तरी ही शिक्षकांना वर्गामध्ये आपण विद्यार्थ्यांसमोर शिकवू शकत नाही याची खंत आहे.
शासनाचा शाळा सुरू करण्याचा जेव्हा निर्णय जाहीर होईल त्याचा विचार करून तसेच प्रशालेची वाढती विद्यार्थी संख्या विचारात घेवून वर्गामध्ये मुलांची बैठक व्यवस्था एक विद्यार्थी-एक बेंच असा तयार करून शासनाच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टन्सचा विचार करुन या बेंचची मांडणी केली आहे. Covid-19 च्या परिस्थितीमध्ये शासनाने शैक्षणिक दृष्टिकोनातून जी काही नियमावली तयार केली त्याची अंमलबजावणी करण्याचे महत्कार्य प्राचार्या सौ.शैला कर्णेकर यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आले आहे. या सर्व संकल्पना पार पाडण्यासाठी प्रशालेचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके व सर्व विभागप्रमूख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…