कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवे प्रशालेस सीबीएसई दिल्ली बोर्डाची मान्यता

कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवे प्रशालेस सीबीएसई दिल्ली बोर्डाची मान्यता

आ.प्रशांत परिचारक यांच्याकडून अभिनंदन  

शेळवे येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने मौजे शेळवे येथे सुरू केली आहे. प्रशालेने सादर केलेला प्रस्ताव मंजूर करून केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिल्ली यांनी कर्मयोगी पब्लिक स्कूल या प्रशालेस केंद्रीय मंडळाच्या अभ्यासक्रमासाठी लागणारे मंडळ संलग्नता प्रमाणपत्र नं.1130975 दि.28.06.2020 रोजी प्राप्त झाले.
सीबीएसई शाळा मान्यतेसाठी प्रशालेने सर्व बाबींची पुर्तता केली असल्यामुळे प्रशालेस मिळाली आहे असे प्रशालेचे प्राचार्य, श्री शिबा नारायण दास म्हणाले. 30 एकराच्या या परिसरामध्ये सर्व सोईंयुक्त व दर्जात्मक साहित्य उपलब्धता व भव्य क्रीडांगण आणि निसर्गरम्य वातावरणात ही प्रशाला असल्याने गुणवत्तेचा दर्जा पुणे-मुंबई सारख्या शहराप्रमाणे राखला जातो.
केंद्रीय मंडळाचे संलग्नता प्रमाणपत्र मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल पद्धतीप्रमाणे कृतीयुक्त शिक्षण त्याचबरोबर इंग्रजी अभ्यासक्रमाच्या अनेक सुवर्णसंधी निर्माण झाल्या आहेत असे प्रतिपादन आ.श्री प्रशांत परिचारक यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य श्री शिबा नारायण दास, कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथील प्राचार्या, सौ.शैला कर्णेकर व संस्थेचे ट्रस्टी श्री रोहन परिचारक तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री गणेश वाळके आदी मान्यवर उपस्थीत होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

15 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago