कर्मयोगी इंजीनियरिंग शेळवे मध्ये ‘GD&T-ASME -Y14.5’ standard-2009” या कार्यशाळेचे आयोजन

कर्मयोगी इंजीनियरिंग शेळवे मध्ये  ‘GD&T-ASME -Y14.5’ standard-2009”  या कार्यशाळेचे  आयोजन

वेबिनार सीरिजमध्ये सातत्य ठेवून कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये वारंवार उपक्रम आयोजित केले जातात आणि याचा फायदा सभोवतालच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना होतो आणि महाविद्यालय आपला एक वेगळा ठसा उमटवत आहे………… प्राचार्य, डॉ.एस.पी.पाटील

श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थी आणि शिक्षकांच्या बौद्धिक विकासासाठी वारंवार वेगवेगळ्या विषयांवर वेबिनार श्रंखला आयोजित करण्यात आल्या आणि या श्रंखला चा फायदा महाराष्ट्रातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेतला.

            वेबिनार श्रंखला चे सातत्य कायम ठेवत महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाने दिनांक 29 व 30 जून 2020 रोजी दोनदिवसीय  वेबिनार श्रंखला GD&T ASME Y14.5 standard 2009 या विषयावर आयोजित केली. या वेबिनारसाठी “एजुकेशन कॅड डेक्कन पुणे” या संस्थेचे डायरेक्टर श्रीरंग साळुंखे मार्गदर्शक म्हणून लाभले. यावेळी webinar सेरीज चे उद्घाटन कॉलेजचे प्राचार्य डॉ एस पी पाटील सर यांनी केले पाहुण्यांची ओळख प्रा उदय कार्वेकर  तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक  वेबिनार सिरीज चे कॉर्डिनेटर मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा राहुल पांचाळ यांनी केले.

            प्रत्येक इंजीनियरिंग ड्रॉईंग ची एकसंघता जपणारे व महत्व वाढवणारे “जॉमेट्री डायमेन्शन अँड टॉलरन्स” (GD&T) अमेरिकन स्टँडर्ड ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग (ASME) या विषयांमध्ये थ्री टू वन प्रिन्सिपल, डिग्रीज ऑफ फ्रीडम, फंडामेंटल डेव्हीयेशन या मुद्यांवर सविस्तर माहिती देऊन उत्पादनक्षमता कशी वाढवता येते तसेच उत्पादन  किंमत कमी करण्यास कशी मदत होते याबद्दलचे मार्गदर्शन पहिल्या दिवशी करण्यात आले पहिल्या दिवशी चे आभार कार्यक्रमाचे को कॉर्डिनेटर प्रा.एस. एस. गायकवाड यांनी मानले.

 

            दुसऱ्या दिवशी चे अध्यक्षस्थान उपप्राचार्य प्राध्यापक मुडेगावकर जे.एल. तर प्रास्ताविक  प्राध्यापक एस. एम. शिंदे यांनी केले दुसऱ्या दिवशी व्याख्याते श्रीरंग साळुंखे यांनी टॉलरन्स कॅल्क्युलेशन GD&T symbol यावर सखोल मार्गदर्शन केले. या दिवशी मानवाचा मेंदू कशा पद्धतीने काम करतो,  आठवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा ट्रिक्स वापरले गेले पाहिजे तसेच मानवी मेंदूचा वापर व्यापारासाठी कसा करता येतो याबद्दलच्या महत्त्वपूर्ण गोष्टीचा खुलासा व्याख्याते मा. श्रीरंग साळुंके यांनी केला दुसऱ्या दिवशी चे आभार प्रा एस.एस. गायकवाड यांनी मानले. या वेबिनारचा 200 पेक्षा जास्त सहभागी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.  वेबिनार आयोजन ऑनलाइन पद्धतीने केले होते त्यासाठी आयटी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. दीपक भोसले यांनी तंत्रज्ञ म्हणून  योगदान दिले. वेबिनार चे  युट्युब वर लाइव्ह प्रक्षेपणही करण्यात आले. प्रत्येक सहभागी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्र देण्यात आले. शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया मधून भविष्यामध्ये ही इंडस्ट्रीमध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअर आणि टूल बद्दलची माहिती देण्याचे आयोजन करण्यात यावे असे सुचवण्यात आले आहे व कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेजला त्यांनी शुभेच्छा देऊन आभार मानले. या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार कॉलेजचे प्राचार्य डॉ एस.पी.पाटील सर यांनी मानले या कार्यक्रमाला उपप्राचार्य जगदीश मुडेगावकर सर्व विभागाचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके, विभाग प्रमुख, शिक्षक, मेकॅनिकल विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

            वेबिनार सीरिजमध्ये सातत्य ठेवून कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये वारंवार उपक्रम आयोजित केले जातात आणि याचा फायदा सभोवतालच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना होतो आणि महाविद्यालय आपला एक वेगळा ठसा उमटवत आहे याचा मला आनंदच वाटतो आणि निश्चितच भविष्याच्या काळातही अशा उपक्रमांना कॉलेज मार्फत आयोजन केले जाईल असे प्राचार्य, डॉ.एस.पी.पाटील  यांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

2 days ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

3 days ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 week ago

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ समाधान आवताडे

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…

1 week ago

चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतुन माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

१२ ऑक्टोबर पासून ५ दिवस कृषी,कृषी उद्योग मार्गदर्शन,प्रदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन…

2 weeks ago