अनलॉक १ मध्ये वाईन शॉप उघडणार नसल्याने अवैध दारू विक्रेते खुश !

अनलॉक १ मध्ये वाईन शॉप उघडणार नसल्याने अवैध दारू विक्रेते खुश !

उत्पादन शुल्कचा अधिकारी सापडतो पण गल्लीबोळातील ”लिकर माफिया ” कसे सापडत नाहीत ? तळीरामांना पडले कोडे 

२० मार्च २०२० पासून सोलापूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील वाईन शॉप व परमिट रम बंद ठेवण्याचा आदेश काढल्यापासून केवळ महात्मा गांधी यांची जयंती,पुण्यतिथी आणि इतर राष्ट्रीय दिवस आदी  ड्राय डे च्या दिवशी आपले उखळ पांढरे करणाऱ्या व एरव्ही राजकारणातील पदासाठी धावपळ करणारे यांच्यासाठी हा कोरोना विषाणू हा वरदान ठरला असून १३ हजार रुपयांचा दारू साठा करणारा उत्पादन शुल्कचा अधिकारी मुद्देमालासहित सापडू शकतो तर रस्त्यावर आपल्या हस्तकाकरवी गेल्या तीन काहीन्यापासून खुलेआम दारू विक्री करणारे लिकर माफिया कसे काय सापडू शकत नाहीत असा प्रश्न आता पंढरपूर शहरातील नागिरकांबरोबरच तळीरामांनाही पडला आहे.   

     जिल्हाधिकारी सोलापूर यांनी जिल्ह्यात दारू बंदीचा आदेश काढल्यापासून पंढरपुरात बेकायदा व अवैधरित्या देशी व बिदेशी बनावटीची दारू विक्री करणारे अनेकजण रोज दिवाळी साजरी करीत आहेत.मात्र रोज दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांना रोज ”मिठाईचे” वाटप करावे लागत आहे अशी चर्चा होत असल्याचेही दिसून येते.एरव्ही ड्राय डे च्या दिवशी उखळ पांढरे करून घेत पुढील महिनाभर गोवा आणि विमल ऐवजी आरएमडीचा स्वाद घेत आपल्या जवळच्या ” कार्यकर्त्यांना” एखाद्या दिवशी मटणाचा रस्सा चाखण्याची सुवर्ण संधी देणारे काही लिकर माफियां कोरोनामुळे लखपती होण्याची स्वप्ने पाहू लागले आणि घडलेही तसेच.कर्व्यदक्ष जिल्हाधिकारी शंभरकर हे सोलापुर शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यात अपयशी ठरले असले तरी जिल्ह्यातील कायदाप्रेमी व्यापारी वर्गावर मात्र त्यांचा चांगलाच प्रभाव दिसून आला व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्रत्येक आदेशाचे काटेकोर पालन व्यापारी वर्गाने केल्याचे दिसून आले.शासनास कोट्यवधी नव्हे तर अब्जावधी रुपयांचा महसूल सोलापूर जिल्ह्यातून उत्पादन शुल्कापोटी प्राप्त होतो.मात्र जिल्हाधीकारी शंभरकर यांनी सबुरीची भूमिका घेतल्याने यावर शासनास पाणी फेरावे लागले.एकीकडे हजारोच्या घरात कोरोना रुग्ण असलेल्या पुणे शहरात वाईन शॉप सुरु करण्यास  परवानगी देण्यात आली मात्र सोलापूर शहर वगळता जिल्ह्यात बहुतेक तालुके कोरोनमुक्त असतानाही जिल्हाधीकारी शंभरकर यांच्या भूमिकेमुळे शासनास मात्र कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.    

                 गेल्या अडीच महिन्याच्या कालावधीत पंढरपूर शहर व तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्या अनेक व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली असली तरी अवैध दारू विक्री काही थांबलेली दिसून येत नाही.पंढरपूर शहरात वाईन शॉप,परमिट रम बंद असले तरी भुकेजलेली मुंगी जशी बरोबर साखरेचा डबा शोधून काढते तसाच प्रकार तळीरामाच्या बाबतीत घडला आहे.सामान्य प्रतीष्ठीत लोक ज्यांना रोज केवळ नाईंटीची  औषधाइतकी गरज भासते असे पांढरपेशे लोक मात्र लोकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात याच पाणवठयावर काही मिळते का हे पाहू लागले ! पहिला महिनाभर त्यांना जवळपास अगदी दुप्पट किंमत मोजून आपली ” तहान ” भागवावी लागली असली तरी पुढे आपल्या ‘सोमरसाचा’ बदललेला स्वाद हा डुप्लिकेट असल्याची भावनाही त्यांच्यात निर्माण झाली.पण केवळ पैसे मिळवणे हेच ध्येय असलेले लिकर माफिया मात्र आपल्याच तोऱ्यात वावरताना दिसून आले.  

             पंढरपूर शहर तालुक्यातील अवैध दारू विक्री बाबत प्रचंड चर्चा होत असतानाच अशा लिकर माफियांवर ज्यांनी कारवाई करणे अपेक्षित आहेत अशा उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर कार्यालयाचे निरीक्षक मिलिंद जगताप यांच्यावरच १३ हजार रुपये इतक्या प्रचंड रकमेच्या अवैध दारू साठा सापडला आणि थेट डीवायएसपी डॉ. सागर कवडे यांनी कारवाई करीत या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. मिलिंद जगताप यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली होती.आणि आता पंढरपूर शहरातील अशाच लिकर माफियांवर देखील कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली.पण अवैध वाळू उपशाची ज्यांना खबर असते असेच लोक दुहेरी भूमिका बजावत असावेत त्यामुळे शहरातील अवैध दारू विक्रीची माहिती कदाचित डीवायएसपी डॉ. सागर कवडे यांना दिली जात नसावी अशी शंकाही व्यक्त होऊ लागली.    

               मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलॉक १ ची घोषणा करीत ८ जून पासून राज्यातील बहुतेक उद्योग व्यवसाय व दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे मात्र सोलापूर जिल्ह्यात वाईन शॉप सुरु करण्यास जिल्ह्यातील लिकर लॉबीची मागणी असूनही निर्णय घेत नसल्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील अवैध दारू माफिया व दरदिवशी ”दोन हजार कमविणारे” देखील खुशीत असल्याची चर्चा होत असून उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मिलिंद जगताप हे निलंबित असल्यामुळे व जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्यामूळे जिल्हाधिकऱ्याच्या आदेशाची अमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेला पंढरपूर पोलीस उपविभाग पंढरपूर शहरातील लिकर माफियांवर कारवाई करेल काय ? गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत पंढरपूर शहर व तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर जुजबी कारवाया झाल्या असल्यातरी अवैध दारू विक्रीतील ”नेहमीचे यशस्वी कलाकार मोकाट असल्याची चर्चा होताना दिसून येते     

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago