पंढरपूर शहर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी गेली चार महिनेपासून अनुदानापासून वंचित असल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली असून लाभाथ्र्यांना तात्काळ अनुदान खातेवर जमा करण्यात यावे अशी मागणी श्रावण बाळ माता पिता सेवा समाजिक संघटना सोलापूर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्तपणे राबविणाज्या शहरी व ग्रामीण भागातील नागरीकांना जेष्ठ वयात कष्टाचे काम होत नसल्याने याचा गांर्भीयाने विचार करुन 65 वर्षावरील जेष्ठ नागरीकांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत श्रावणबाळ, इंदिरागांधी, वृध्दापकाळ, विधवा, घटस्फोटीत, अपंग, राष्ट्रीय कुंटुंबलाभ, कर्ण बंधीर, मुकबधीर, अंध ,पाण्यात बुडून इ. योजनेद्वारे शासनाकडून अनुदान दिले जाते.
राज्यात कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव वाढत असून सर्वत्र लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झालेली असून राज्य शासनाने समाजातील दुर्बल घटकांसाठी असलेल्या विविध योजनेच्या लाभाथ्र्यांची अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून तीन महिनेचे अनुदान लाभाथ्र्यांच्या खातेवर जमा करण्याचे जाहीर केले. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये या योजनेचे अनुदान संबंधीत तहलिसदार यांनी लाभाथ्र्यांच्या खातेवर जमा केलेले आहे, असे असताना पंढरपूर तहसिल येथील तहसिल कार्यालयाने आज पावेतो 40 टक्के लाभाथ्र्यांच्या खातेवर अनुदान जमा केले असून उर्वरीत राहिलेल्या 60 टक्के लाभार्थी अजुनही अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे लाभाथ्र्यांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांना उदरनिर्वाह करणे अडचणीचे झाले आहे. पंढरपूर तहसिल मधील आधिकारी यांचेकडे लाभाथ्र्यांचे अनुदान जमा होणेबाबत चौकशी केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. या गलथान कारभारामुळे लाभार्थी मेटाकुटीला येत आहे.
राहिलेल्या लाभाथ्र्यांचे अनुदान अजुनही त्यांचे खातेवर जमा करण्यात आले नाही याची खातेनिहाय चौकशी होवून संबंधीत दोषी असणाज्या आधिकारी यांचेवर कारवाई करण्यात यावी असेही लाभार्थी वर्गाकडून मागणी होत आहे.