… आणि पंढरपुरातील ज्ञानेश्वर नगरने टाकला सुटकेचा निःश्वास !
संपर्कातील सर्व अहवाल निगेटिव्ह
हातावरले पोट असलेला आमचा परिसर चिंतामुक्त झाला – संजय बंदपट्टे
पंढरपूर शहरातील अतिशय दाट लोकवस्तीचा व शहराच्या मुख्य बाजार पेठे लगत असलेला परिसर म्हणून ज्ञानेश्वर नगर ओळखले जाते.मुळचे ज्ञानेश्वर नगर येथील असलेले परंतु रोजगारासाठी महानगरात गेलेले येथील अनेक कुटुंबे आहेत.यापैकीच दोन कुटूंबातील काही व्यक्ती या पंढरपुरात दाखल झाल्या होत्या मात्र स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलत त्यांना संस्थात्मक विलगीकरण होण्यास भाग पाडले होते.या दोन्ही कुटुंबातील २ व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यामुळे पंढरपुरात मोठी खळबळ उडाली होती. तर प्रशासनाने तातडीने हा संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करून सील केला होता.सदर पॉझिटिव्ह रुग्ण हे संस्थात्मक कोरेन्टीन असतानाही काही लोकांचा त्यांच्याशी संपर्क आलेला होता तर सदर रुग्णांपैकी एक महिला घरी येऊन राहून गेली होती अशी अफवा देखील पसरली होती.या सर्व प्रकारची गंभीर दखल घेत प्रांताधिकारी ढोले व मुख्याधिकारी मनोरकऱ यांनी खबरदारी म्हणून हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील काही जणांचे स्वाब (swab) टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला होता.
आज ज्ञानेश्वर नगर परिसरातील या दोन रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचे कोरोना टेस्ट अहवाल निगेटिव्ह आले असून त्यामुळे ज्ञानेश्वर नगर परिसरातील बहुतांश कष्टकरी व आर्थिक दृष्टया दुर्बल असलेल्या नागिरकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.हे अहवाल निगेटिव्ह असल्याचे समजताच ज्ञानेश्वर नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संजय बंदपट्टे यांनी फिजिकल डिस्टन्स पाळत घरोघरी पेढे वाटून आनंद साजरा केला असून या बाबत पंढरी वार्ताशी बोलताना संजय बंदपट्टे म्हणाले कि,आमचा हा परिसर हा बहुतांश मोलमजुरी,रोजंदारी व खाजगी दुकाने व्यवसाय आदी ठिकाणी काम करणाऱ्या कष्टकरी वर्गाचे वास्तव्य असलेला परिसर आहे.मूळचे आमच्या भागातील असलेले परंतु पंढरपुरात आल्यानंतर इन्स्टिट्यूशनल कोरेन्टीन करण्यात आलेल्या दोन व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या परिसरात अतिशय चिंतेचे वातावरण होते.अशातच हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केल्यामुळे नागिरकांना आपल्या उद्योग,व्यवसाय अथवा नोकरी,रोजगारासाठी बाहेर पडता येत नव्हते.ते जिथे कामास होते तेथील तेथील लोकांना त्रास नको म्हणून अनेकांनी बाहेर पडणे टाळले होते.खरे तर रोजच्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक कुटूंबाचे प्रपंच बंद पडले होते.पण आता आम्ही सुटकेचा निश्वास सोडला असून त्यामुळेच आम्ही आनंद साजरा करीत असल्याची प्रतिक्रया समाजसेवक संजय बंदपट्टे यांनी व्यक्त केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…