पंढरपूर शहर तालुक्यात आढळले ५ कोरोना पॉझिटिव्ह !
प्रांताधिकारी सचिन ढोले आणि न.पा.मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांनी थोपवले पंढरपुरावरील महासंकट !
देशभरात कोरोनाचा वेगाने संसर्ग होत असताना व या महाराष्ट्रातील मुबई-पुणे-औरंगाबाद-सोलापूर सारखी महानगरात दररोज मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या आढळून येत असताना पंढरपूर मात्र यापासून दूर होते.जगतनियंता पांडुरंगाचे आभार मानत पंढरपूरकर रोज सुटकेचा निश्वास सोडत असतानाच चारच दिवसापूर्वी उपरी तालुका पंढरपूर येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला.त्यामुळे पंढरपुरांचे टेन्शन वाढले.होते. उपरी येथील सदर व्यक्ती हा पंढरपूर तालुक्यात दाखल होताच संस्थात्मक विलगीरकन करण्यात आला होता.मात्र सदर व्यक्ती हा पंढरपुरात फेरफटका मारून गेला आहे अशा अफवा काही मूर्खांनी पसरवल्या होत्या त्यामुळे पंढरपूरकर धास्तावले होते.पण हा प्रकार खोटा होता.मात्र आज अखेर पंढरपूर शहरातील मूलनिवासी असलेले २ व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून हे दोन्ही व्यक्ती शहरातील अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी परिसरातील आहेत.तर एक व्यक्ती हा उपरी,एक गोपाळपूर येथील तर एक करकंब येथील आहे.
आज पंढरपूर शहरातील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या दोन्ही व्यक्ती महानगरातून पंढरपुरात आलेल्या होत्या आणि त्यांचा होम कोरेंटाईनचा आग्रह होता मात्र त्यास दाद न देता प्रांताधिकारी सचिन ढोले आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांनी संस्थात्मक कोरेंटाईनचा आग्रह धरत संबंधित ठिकाणी पाठवले.
यापैकी एक पॉझिटिव्ह रुग्णास सुरुवातीस कुठलेही लक्षणे आढळून येत नव्हती.पुढे त्यास सर्दीचा त्रास होऊ लागला इतकेच.पण रिस्क नको म्हणून चाचणी घेण्यात आली आणि सदर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली.विशेष म्हणजे याचा संस्थात्मक विलगीकरणाचा कालावधी दोनच दिवसात संपुष्ठात येणार होता आणि त्या नंतर शहरातील एका दाट लोकवस्तीच्या परिसरातील झोपडपट्टीतील आपल्या घरी ते कुटुंब जाणार होते.
वेळीच प्रशासनाने दखल घेतली नसती तर पुढे पंढरपूरकरांवर भीषण संकट ओढवले असते.त्यामुळेच आपण पंढपूरकरकरानी प्रांताधिकारी सचिन ढोले आणि नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…