तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांविरोधात पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई
कोरोना विषाणूचा प्रसार रोखणेकामी जिल्हाधिकारी सोलापूर यांनी जारी केलेल्या विविध प्रतिबंधात्मक आदेशानुसार जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस प्रतिबंध करण्यात आलेला असतानाही पंढरपूर शहरात दोन इसम अशा प्रकारच्या पदार्थांची विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने पंढरपूर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुलजार सलीम तांबोळी (देवळे) व अनिल सुर्यकांत कोंडावाड या दोन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पो.काँ. राहुल हणमंत लोंढे नेमणुक तपास पथक,उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,पंढरपूर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार कराड नाका वांगीकर नगर येथे गुरूप्रसाद प्रोव्हिजन किराणा व स्टेशनरी दुकानाजवळ दोन इसम पाँलीथीनच्या बॅगा घेवून दिसले. पोलिसांना पाहताच त्यांनी गाडी वळवून गुरूप्रसाद दुकानाजवळून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलसांनी त्यांना ताब्यात घेतले जवळील पाँलिथीन बगा पंचासमक्ष तपासणी केली असता, त्यामध्ये तंबाखुच्या वेगवेगळया कंपनीच्या पुडे व पुडया, विडी, सुट्टी तंबाखु, सिगारेट असे साहीत्य मिळून आले. तसेच स्कुटीच्या समोरील बाजूस असलेल्या फुटरेस्टवर एका खाकी बाँक्समध्ये ब्रिस्टाल व गोल्ड प्लक सिगारेटचे बाँक्स ठेवलेले दिसले. पंचासमक्ष स्कुटीच्या मागे बसलेल्या इसमास नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अनिल सुर्यकांत कोंडावाड वय 45 वर्षे व्यवसाय-व्यापार रा.लिंकरोड, वांगीकर नगर, पंढरपूर जि.सोलापूर असे सांगीतले. तसेच पाँलीथीन बगमध्ये असलेला तंबाखुजन्य पदार्थ त्याचे असल्याचे व विक्री करीता घेवून जात असल्याचे सांगीतले. तसेच स्कुटी चालक गुलजार सलीम तांबोळी वय 34 वर्षे व्यवसाय-किराणा माल विक्रेता(फेरी) रा.नगरपालीका दवाखान्या समोर पंढरपूर जि.सोलापूर असे असल्याचे सांगीतले.
लोकांच्या जिवीतास धोकादायक असलेल्या कोरोना रोगाचा संसर्ग पसरविण्याची कृती करून, मा.जिल्हाधिकारी सो.सोलापूर यांनी बंदी घातलेल्या तंबाखुजन्य मालस्वतःच्या ताब्यात बाळगून विक्री करत असताना मिळून आले आहेत. म्हणून माझी वरील दोघांविरूध्द सरकारतर्फे भारतीय दंड संहीता कलम 269, 188 साथीचे रोग अधिनीयम 1897 कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत पो.हे.कॉ.यलमार, पो.ना.भोसले,पो.ना. रोंगे यांनीही सहभाग घेतला.