अवैध वाळू चोरी रोखणाऱ्या पोलीस पथकास मारहाण करणाऱ्या ‘त्या’ आरोपींचा शोध सुरुच !

अवैध वाळू चोरी रोखणाऱ्या पोलीस पथकास मारहाण करणाऱ्या ‘त्या’ आरोपींचा शोध सुरुच !

पंढरपूर तालुक्यातील त.शेटफळ येथील घटना

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

आज दिवसभर पंढरपूर शहर व तालुक्यात पंढरपूर शहर उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मिलिंद जगताप यांच्यावर केलेल्या कारवाईत जवळपास १३ हजार रुपये इतक्या भल्या मोठ्या किमतीचा अवैध दारूसाठा जप्त केल्याच्या चर्चेने खळबळ उडवून दिलेली असतानाच पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथे अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी गेलेल्या तालुका पोलीस ठाण्याच्या पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली असल्याची चर्चा देखील होताना दिसून येत असून थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या श्रीमुखात भडकावण्याबरोबरच सोबतच्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आले असल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी ७ जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणला यासह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
           या बाबत मिळालेल्या माहितीनुसार व सचिन महादेव तांबिले वय 32 वर्षे ने.पंढरपुर तालुका पोलीस ठाणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादींनुसार तपकिरी शेटफळ गावचे हददीतील माण नदीचे पात्रातुन विनापरवाना चोरून वाळु उपसा करून त्याची त्यांचे अशोक लेलंड या चारचाकी मालवाहु गाडीतुन चोरटी वाहतुक करीत आहेत अशी बातमी मिळालेने लागलीच सदर पोलीस कर्मचारी पो.कॉ. भराटे, पो. कॉ. नरळे हे खाजगी वाहनाने मौजे तपकिरी शेटफळ गावाकडे जात असताना तपकिरी शेटफळ या गावातील अहिल्या चौकाचे पुढे 100 मीटर अंतरावर असणारे माण नदीचे बंधा-याकडे जाणारे रस्त्याजवळ गेलो असताना समोरून एक बिगर नंबरचे चार चाकी वाहन येत असलेचे दिसले.त्याचा संशय आलेने या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर वाहनास हाताचा इशारा करून ते वाहन जागीच थांबवुन वाहनाची पाहणी केली असता वाहनाचे हौदयामध्ये वाळु असलेली दिसली. वाहनाचे केबीन मध्ये ड्रायव्हर व त्याचे सोबत एक इसम तसेच वाहनाचे हौदयातील वाळुवरती 03 इसम बसलेले दिसले.वाहनाचे चालकास व शेजारील बसलेले इसमास त्याचे नाव पत्ता विचारता चालकाने आपले नाव संकेत उर्फ भैया हणमंत पळसे व शेजारी बसलेल्या इसमाने त्याचे नाव बबलु हणमंत पळसे दोघे रा.तपकिरी शेटफळ असे सांगण्यात आले.त्यास सदरची वाळु कोठुन आणली आहे ? तुमच्याकडे वाळु उपसा करण्याचा अगर वाळु वाहतुकीचा पास परवाना आहे काय ? याबाबत त्यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांचेकडे वाळु उपसा करण्याचा अगर वाहतुकीचा पास परवाना नसल्याचे सांगुन सदर वाळु तपकिरी शेटफळ गावातील माण नदीचे पात्रातुन चोरून उपसा करून आणली असलेचे सांगत असतानाच सदर वाहनाचे पाठीमागुन एक होंडा शाईन कंपनीची मोटार सायकलवरती दोन इसम आले व त्यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांना तुम्ही कोण आहे ? आमची गाडी का थांबविली असे विचारलेवर पोलीस कर्मचारी असल्याचे सांगून देखील शाईन मोटार सायकलचा चालक हा त्यांच्या अंगावर धावुन गेला व तुम्हाला माहीत नाही का मी कोण आहे ? मला माऊली मेटकरी म्हणतात. तुम्ही आमची गाडी कशी घेवुन जाता ते बघतोच असे म्हणुन शिवीगाळी करून फिर्यादी पोलीस कर्मचारी सचिन महादेव तांबिले यांची गच्चीस धरून गालात चापट मारली व वाहनातील इसमानी खाली उतरून पोक/25 भराटे, पोक/1486 नरळे यांना तुम्ही गाडी कशी घेवुन जाता ते बघतोच असे म्हणुन दमदाटी करून त्यांचेशी झोंबाझोंबी करू लागलेवर आवाजाने आजुबाजुचे राहणारे लोक जागे झालेवरमारहाण करणारे आरोपी त्यांचे ताब्यातील चारचाकी वाहन जागीच सोडुन, बिगर नंबरचे शाईन मोटार सायकल व काही इसम नदीचे बाजुने अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले.
या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी जमलेल्या लोकांकडे पळुन गेलेल्या इसमाचे नाव,पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे 1) संकेत उर्फ भैया हणमंत पळसे 2) बबलु हणमंत पळसे 3) माऊली उर्फ ज्ञानेश्वर शिवाजी मेटकरी 4) विजय लक्ष्मण बनसोडे 5) नवनाथ पंडीत इंगळे 6) प्रशांत प्रल्हार कोळी उर्फ माने 7) नितीन भारत माने रा. अ.क्र. 3 रा.महमदाबाद ता.मंगळवेढा व इतर सर्व हे तपकिरी शेटफळ गावचे राहणारे असलेचे सांगीतले. भा.द.वि.क 379, 353, 332, 143, 147, 149, 183, 186, 189 सह पर्यावरण कायदा कलम 9,15 प्रमाणे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद करण्यात आली.
या गंभीर प्रकणामुळे पंढरपूर तालुक्यातील वाळू अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्याचा देखील धाक राहिला नसल्याचे दिसून येते.या प्रकरणातील आरोपीना नक्की वरदहस्त कुणाचा होता व ते सातत्याने कुणाच्या संपर्कात होते याचा शोध घेणे गरजेचे आहे.अशीच प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.या पूर्वी कौठाळी येथे देखील अशीच घटना घडली होती त्यामुळे पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू उपसा करणारे किती निर्ढावले आहेत हे दिसून येते. दोन दिवसापूर्वी पंढरपूर शहर पोलिसांनी देखील केलेल्या कारवाईत एक विना नंबरची पीक उप जप्त करण्यात आली असून याही घटनेत सदर वाळू चोर हे पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago