कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरमध्ये विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन छंदवर्गाचे प्रशिक्षण सुरु
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे जरवर्षी उन्हाळी सुट्टीत विविध छंदवर्ग व शिबीरे घेतली जात असतात. परंतु कोरोना या महामारीमुळे गेले दीड ते दोन महिने ही उन्हाळी वर्ग व शिबीरे ही प्रत्यक्षात घेणे होत नाही म्हणुन याकरीता कर्मयोगी विद्यानिकेतनने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी इयत्ता ३री ते १० वीच्या विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन छंद वर्ग घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
वैश्विक संकट कोरोना विषाणुमुळे दिड ते दोन महिने लॉकडाऊन जाहिर केला आहे. त्यामुळे १५ मार्चपासून राज्यातील सर्वच शाळा बंद असुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर यांच्या संकल्पनेतून प्रत्येक इयत्तेसाठी ऑनलाईन छंदवर्ग सुरु करण्यात आले आहेत. इ.३ री ते १० वीचे वर्ग सकाळी ९ ते दु.१२.४० या वेळेत घेतले जातात. त्याचप्रमाणे छंदवर्ग सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत पूर्ण करुन घेतले जातात. या ऑनलाईन छंद वर्गाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. याबरोबरच इंग्रजी, मराठी, हिंदी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, संस्कृत इत्यादी विषय ऑनलाईन शिकविले जातात. त्याचप्रमाणे छंदवर्गामध्ये चित्रकला, संगीत, नृत्य व तायक्वांदो यांचेही ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी सर्व शिक्षकांना ऑनलाईन वर्ग कशा पद्धतीने घेतले जावेत याचे प्रशिक्षण दिल्यानंतरच त्या-त्या वर्गांचे ऑनलाईन क्लासेस सुरु करण्यात आले आहेत. या माध्यमातून सामाजिक अंतर, स्वच्छता व कोरोनासंदर्भात जनजागृती याचा संदेश दिला गेला.
या छंदवर्गासाठी प्राचार्या सौ शैला कर्णेकर, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांनी नियोजन केले व प्रशालेच्या शिक्षकवृंदांनी याचे कार्य उत्साहात सुरु केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…