फेसबुकवर अकाउंटच्या माध्यमातून ऑनलाईन दारू विक्रीचा फंडा
फसवणूक करण्यासाठी गोसावी वाईन शॉपच्या फोटोचा गैरवापर !
या गंभीर प्रकरणाची दखल घेत कठोर कारवाई करणार- एम.एम.जगताप (निरीक्षक उत्पादन शुल्क विभाग)
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने २१ मार्च पासूनच राज्यातील वाईनशॉप आणि परमिट रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.मात्र तरीही कुठे चोरून तर कुठे अगदी उघडपणे देशी-वीदेशी दारूची दुप्पट तिप्पट दराने विक्री होत असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेत होत होती तर प्रत्यक्ष दारूची सवय असणाऱ्यांना मात्र त्याचा कटू अनुभव येत होता.एकीकडे दुप्पट -तिप्पट रेट मोजून अनेकवेळा बनावट दारू असल्याचे आढळून येत असल्याचा अनेकांना अनुभव येत आहे.त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दारू विक्रीची अनेक दुकाने व परमिटरूम फोडून चोऱ्या होत असल्याचे दिसून येते.१५ एप्रिल पासून वाईन शॉप उघडण्यास परवानगी मिळेल अशी चर्चा होत असतानाच लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविण्यात आला व वाईन शॉप सुरु होणार नसल्याचे स्प्ष्ट झाले.याचाच गैरफायदा घेत थेट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून देण्यात आलेल्या ९८६१९९७८५६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता ९११४७८०८३३ या मोबाईल क्रमांकाशी संलग्न असलेल्या गुगल पे अकाऊंट वर पैसे पाठवा तुम्हाला पाहिजे त्या ब्रॅण्डच्या दारूची होम डिलिव्हेरी मिळेल असे सांगितले जात आहे.
या फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून काही मोबाईल नंबर देण्यात आले असून गुगल पे अथवा पेटीएमच्या माध्यमातून पैसे पाठवा आपणास दारू घरपोहोच केली जाईल असे सांगण्यात येत आहे.या बाबत उत्पादन शुल्क विभागाचे एम.एम. जगताप यांच्याशी संपर्क केला असता ऑनलाईन दारू विक्री हि बेकायदेशीर असून लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारे बनावट फेसबुक अकाउंट काढून फसवणूक केली जात आहे.उत्पादन शुल्क विभाग या प्रकरणाचा छडा लावून ठोस कारवाई करेल लोकांनी अशा फसवणुकीच्या प्रकारास बळी पडू नये असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मिलिंद जगताप यांनी केले आहे.या प्रकरणाबाबत गोसावी वाईन्स शॉपचे मुन्नागिर गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता याच्याशी आमचा काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…